दिव्यांग बांधवांच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील – नितीन औताडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून ते मुंबई मंत्रालयापर्यंत जे अडथळे असतील ते सर्व सोडवले जातील.समाजातील मुलभूत घटक म्हणून दिव्यांग बांधवांसाठी नेहमीच शिवसेना खंबीरपणे पाठिशी उभी आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.

ते शिवसेना पक्षाच्या वतीने मध्यवर्ती ठिकाणी श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या दिव्यांग बांधव विशेष नावनोंदणी शिबिर तसेच दिव्यांग बांधवांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करताना बोलत होते.या शिबिरात जवळपास 200 हून अधिक दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी माजी  आ. भाऊसाहेब कांबळे, माजी नगरसेवक संजय छल्लारे, उपनगराध्यक्ष विशाल शिरसाठ, जिल्हाप्रमुख बांधकाम कामगार सेना युवानेते रविंद्र जाधव, इम्रान शेख उपजिल्हाप्रमुख बांधकाम कामगार सेना, बाबासाहेब भालेराव तालुकाप्रमुख, बांधकाम कामगार सेना, जमील भाई शेख , रविंद्रभाऊ जाधव, सुनील फुलारे, अमोल शिरसाठ, सुमित रहिले, करण गायकवाड, अमित बाचल, आकाश शिंदे, जमीर पठाण, प्रकाश पठाडे, अक्षय चौधरी, मनीष शिंदे आदी उपस्थित होते. माजी आ भाऊसाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सतत प्रयत्नशील राहू.याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल व नगरपालिका स्तरावर विशेष शिबिरे घेऊन दिव्यांगांना घरकूल योजना, दिव्यांग 5% निधी, संजय गांधी योजना, व्यवसायासाठी गाळे व उपकरणे तसेच आवश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.उपस्थिताचे अहिल्या नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply