औताडे सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचा उत्कर्ष – नितिनराव औताडे 

आदर्श व्यक्ती व गुणवंताचा सर्वसाधारण सभेत सन्मान 

 कोपरगाव प्रतिनिधी, २५ :  स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी सन १९६९ साली पोहेगावात पोहेगांव नं २ विकास सोसायटीची स्थापना केली. अत्यंत काटकसरीने पारदर्शक व्यवहाराच्या जोरावर त्यांनी सभासदांना न्याय दिला. दिवसेंदिवस ही सोसायटी विविध उपक्रमाच्या जोरावर प्रगती कडे वाटचाल करत आहे. संस्थेकडे स्वतःची इमारत आहे. व्यापारी गाळ्यांची निर्मिती केल्याने या संस्थेमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.

शेतीपूरक व्यवसायात भर घालण्यासाठी वसुबारस दूध संकलन केंद्र देखील चालू झाले आहे, त्यामुळे त्यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या दुधाला अधिकचा भाव मिळत आहे. श्री चांगदेवराव गणपतराव औताडे पाटील विकास सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचा उत्कर्ष होत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले. ते संस्थेच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे होते. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.मनीषा राहुल रक्ताटे व जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती नवीन शाळेच्या आदर्श शिक्षिका गोपाळे मॅडम यांना जिल्हा परिषदेचा आदर्श  शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.

तर गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवल्याबद्दल धनश्री राहुल रक्ताटे, सिद्धार्थ योगेश लोखंडे, आशुतोष नितीन मोराडे, विहान विकास गवळी, कु. फरीन इरफान शेख, वेदीका सुनील सोनवणे व श्रेया नवनाथ पेटारे यांचा ट्रॉफी सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देत सत्कार केला. 

संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे यांनी संस्थेला 4 लाख 55 हजार 612 रुपये नफा झाला असून संस्था सभासदांच्या हितासाठी विविध प्रकारचे निर्णय घेत असल्याचे सांगत यावर्षी दिवाळीपूर्वी सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विषय पत्रिकेचे वाचन सचिव गोरक्षनाथ पटांगरे यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक दिलीप औताडे यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र औताडे, उपाध्यक्ष अशोक वाके, संचालक सुनिल बोठे, अनिल औताडे, दिलीप औताडे, संजय औताडे, कैलास औताडे, अनिल औताडे, सुनिल हाडके, सौ.सिमाताई औताडे, सौ.यमुनाबाई लांडगे, सोमनाथ सोनवणे, मधुकर भालेराव, तसेच सभासद उपसरपंच अमोल औताडे राजेंद्र औताडे, सुनिल औताडे, अशोक औताडे, चांगदेव पाचोरे, नितीन आभाळे, गणेश गोसावी, आण्णासाहेब औताडे, रंगनाथ देशमुख, गोरक्षनाथ जोंधळे, भीमा औताडे, सुखदेव भोजने , सचिव संदीप फटांगरे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाण्याचा पीएच परिणाम उपाय यासंदर्भात पुणे येथील बापूसाहेब लगड यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करत माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव संदिप फटांगरे यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वाके यांनी मानले.

Leave a Reply