शेवगाव महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा – उपसरपंच काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील बोधेगांव शहर व लगतच्या वस्त्यांवर गेल्या अनेक दिवसांपासुन वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे. आठवड्यातुन चार-पाच दिवस पुर्ण दिवस किंवा पुर्ण रात्रभर बत्ती गुल असते. तर कधी-कधी पुर्ण दिवस-रात्र विजपुरवठा खंडीत असतो त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या आधिकाऱ्यांना अनेकदा विनंती करूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने कोणतीही पुर्व सुचना न देता महावितरणच्या शेवगाव येथील कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा बोधेगांवचे उपसरपंच पै. संग्राम काकडे यांनी दिला आहे.

        यावेळी काकडे म्हणाले, शेवगांव शहरानंतर बोधेगांव हे सर्वात मोठया लोकसंख्येचे व्यापारी पेठेचे गांव आहे. येथे लहान मोठे शेकडो उद्योग आणि व्यवसायिक आहेत. विज पुरवठा बंद तर येथील उद्योग व्यवसाय बंद पडतात. त्यामुळे रोजची कमई करून चरितार्थ चालवणारे आणि या ठिकाणी रोजंदारीवर कामावर असणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ येते. तर प्रचंड उकाड्याने लहान मुले, आणी ज्येष्ट नागरिकांचे प्रचंड हाल होतात.

         रात्रभर लाईट नसल्याने शहरासह लगतच्या वस्त्यावर चोऱ्या होतात. चोरटयांच्या दहशतीखाली नागरिक रात्रभर जागरण करतात, तर खेड्यापाडयातून धान्य दळण्यासाठी पिठाच्या गिरणीत येणाऱ्याचे खुप हाल होतात. कधी तर आर्धे दळण गिरणीत व आर्धे  डब्यात असतानाच विज गायब होते. ती दोन दिवस येतच नाही. अशी अवस्था होते. या सर्व परिस्थिती बाबत २३ मे रोजी महावितरणच्या बालमटाकळी उपकेंद्राच्या कनिष्ट अभियंत्याला लेखी निवेदन देवून आंदोलनाचा इशार दिला होता. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येवुन १५ ते २० मिनाटांपेक्षा जास्त वेळ विज खंडीत होणार नाही असे तोंडी आश्वासन दिले होते.

परंतू त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात विज पुरवठा नियमित व पुर्ण दाबाने सुरळीत न झाल्यास कोणत्याही क्षणी शेवगांव येथील महावितरणचे उप कार्यकारी आभियंता यांचे दारात बसुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच पै. संग्राम काकडे यांनी लेखी निवेदनाद्वारे सर्व संबंधीतांना दिला आहे. या निवेदणावर सरपंच सौ. सरला घोरतळे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.