कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : सहकाराची पंढरी समजलेल्या कोपरगाव, राहता तालुक्यासह राज्यात माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी केवळ सहकार रुजवला नाही तर तो टिकवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावले. सहकारी साखर कारखान्याच्या व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाची अर्थक्रांती मजबूत करीत सहकारी साखर कारखान्यात साखरे बरोबर अनेक उपपदार्थ बनवण्याचे नवनवीन विक्रम केले.

सहकार मोडीत काढणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत सहकार खोलवर सक्षम रुजविण्यात स्व. कोल्हेंचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या अभ्यासपूर्ण वक्तव्याने परखड मत मांडणारे, राजकारणासह सहकारात डरकाळी फोडणारा ढाण्या वाघ म्हणजेच स्व. शंकरराव कोल्हे होत. स्व. कोल्हेंचा राजकीय दरारा आदरपूर्वक तितकाच होता. अतिशय प्रामाणिकपणे सहकार चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अशा ढाण्या वाघाचा छावा म्हणजे विवेक कोल्हे आहेत.

विवेक कोल्हे हे सहकारात अनेक क्रांतीकारी बदल घडवत आहेत. अतिशय कमी वयात त्यांनी अनेक पदांची जबाबदारी पार पाडत आहेत. स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी तसेच सहकारी क्षेञाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी नुकताच नवा विक्रम करीत देशातला पहीला सहकारी साखर कारखाना आहे जो सीएनजी बनवून देशात इतिहास घडवला.

सहकारातील दिपस्तंभ असलेले स्व. कोल्हे यांच्या विचारांशी एकरुप होवून अनेक वर्षे सहकार क्षेञतील अभ्यासक असलेले संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व राजकारणातील एकनिष्ठ भाजपच्या नेत्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचे काम नव्या पिढीचे विवेक कोल्हे करीत आहेत. कौटुंबिक वारसा पुढे चालवताना राजकारणापलीकडे जावून समाजकार्याची आवड असणारा युवा नेता अशी ख्याती विवेक कोल्हेंनी कमी काळात निर्माण केली. विवेक कोल्हे हे सध्या राजकारणाच्या रांगेतील तत्वज्ञानी व मुत्सद्दी युवा नेते आहेत.

देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंञी व देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अमित शहा यांना अनेक नेत्यांना लवकर भेटता येत नाही माञ कोल्हे कुटूंबाची एकनिष्ठता व विवेक कोल्हे यांचे कार्य अमित शहा यांना अधिक लक्ष वेधणारे असावे म्हणुन की काय विवेक कोल्हे यांना अमित शहा दिल्लीत भेट देतात. इतकंच काय थेट कोल्हे यांच्या दोन नव्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला येतात. विवेक कोल्हे हे आगामी काळात राजकारणातील उगवता तारा असल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. विवेक कोल्हे हे मतदार संघासह अनेक ठिकाणी हजारो निराधारांना विविध प्रकारे मदत करून बळ दिले.

वाढता बेरोजगारीने हैराण झालेल्या तरुणाईला नामवंत कंपन्यांमध्ये नोकऱ्या देवुन हजारो कुटूंबाना जगण्याची दिशा दिली. केवळ रोजगार देवून थांबले नाही तर गोरगरीब, कष्टकरी कुटुंबातील मुलामुलींचे सामुदायिक विवाह सोहळे करुन त्यांच्या आयुष्याची रेशिम गाठ बांधली. सामान्य माणसांचे लग्नसोहळ्यासाठी वाया जाणाऱ्या पैशाची बचत करून अर्थीक हातभार लावला. पैशाविना लग्न थांबलेल्यांना मोफत लग्न लावून देत नवी सामाजिक क्रांती करीत आहेत.

दरवर्षी सामुदायिक लग्न सोहळे करून कोल्हे परिवार जनमाणसांचे सच्चे सेवेकरी होत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब , कष्टकरी, शेतकऱ्यांच्या अंगणापर्यंत ज्ञानाची गंगा घेवून जाणारे स्व. कोल्हे यांचे शिक्षण क्षेत्रातील अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी. नितीन कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे व कोल्हे परिवारातील प्रत्येक सदस्य प्रमाणिक कार्य करीत आहेत. संजीवनीत शिक्षण संस्थेचे रूपांतर थेट विद्यापीठात करुन वेगळी उंची गाठली.

केवळ सत्तेसाठी नाही तर समाज परिवर्तनासाठी कार्य करणारे विवेक कोल्हे म्हणजे राजकारणातील परिवर्तनाची नांदी आहे. आपल्या विचाराव ठाम व कर्तव्यात कोणतीही कुचराई न करणारे कोल्हे यांचे हे राजकारण व समाजकारण राज्यातला अनेकांना अंतर्मुख करणारे आहे. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी संघर्ष करणारा कोल्हे परिवार कायम एकनिष्ठ राहिला आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदार संघाच्या व विधानसभे निवडणुकीत कोल्हे यांची ताकत दिसुन आली.

विवेक कोल्हे हे दुरदृष्टी असलेले नेते आहेत फक्त विचारातून नाही तर आचरणातून समाज परिवर्तनासाठी त्यांची धडपड सुरु असते. म्हणूनच राज्यातील व देशातील वरिष्ठ पातळीवर विवेक कोल्हे कायम लक्षवेधी युवा नेते ठरले आहेत.सर्वधर्म स्वभावाची शिकवण देणारे स्व. शंकरराव कोल्हे यांचे विचार विवेक कोल्हे आपल्या कृतीतून दाखवत आहे. विवेक कोल्हे यांच्याकडे कोणतेही राजकीय पद सध्या तरी नाही परंतू त्यांच्या दानशुर ववयक्तीमत्वामुळे व अभ्यासपूर्ण कार्याने प्रभावित झालेले नागरीक कायम त्यांच्या भोवती गर्दी करतात.

सर्वाधिक भेटीगाठी घेणारा व विविध कार्यक्रमात व्यस्त असणारा प्रभावी युवा नेता म्हणजे विवेक कोल्हे आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे संबंध असलेला कोल्हे परिवार आपल्या पदापेक्षा वरीष्ठांची तसेच पक्षश्रेष्ठीची पत जपणारा परिवार आहे. राजकीय पद असले नसलेले तरीही कोल्हे एकनिष्ठेने कसे कार्य करतात याची प्रचिती अनेकांना येत आहे. कायम विनम्र असलेले विवेक कोल्हे यांच्या कार्य शैलीने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.
बड्या राजकीय घराण्यातले असलेले विवेक कोल्हे लोकांना नेता वाटत असतीलही पण ते कधीच आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्ती बरोबर नेता म्हणून कधीच वागले नाही. त्यांच्यातील विनयशीलता, माणुसभाव, ते आमचे नेते नाही तर ते राजकारणा पलीकडेजावून मिञच वाटतात. त्यांच्याशी कायम मिञत्वाचे संबंध जोडले जात आहेत अशी भावना व्यापारी अंकुश वाघ यांनी कोल्हे प्रति व्यक्ती केली.
