गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तींची विवेक कोल्हे यांच्या हस्ते स्थापना

    कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : जगातील एकमेव मंदिर असलेल्या कोपरगाव बेट भागातील गुरू शुक्राचार्य महाराजांच्या  दोन मूर्तींचे पूजन व स्थापना जिल्हा बँकेचे संचालक युवक नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

गुरु शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येचा महिमा संपूर्ण विश्वात नावलौकिकास्पद होता या इतिहासाची आठवण यानिमित्ताने सतत होत राहील असे येते यावेळी बोलताना म्हणाले. विवेक कोल्हे व पराग संधान यांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

   दोन फूट उंच असलेल्या या गुरु शुक्राचार्यांच्या प्रसन्न मूर्ती भाळवणी येथील प्राध्यापक संजय काळे यांनी तयार केल्या आहेत. भाविकांसाठी खास अभिषेक कक्ष येथे स्थापन करण्यात आला असून एक मूर्ती गाभाऱ्यात तर एक अभिषेक लक्षात ठेवण्यात आली आहे. पूजन व मध्यान आरती होऊन महाप्रसाद वाटण्यात आला.  

    विवेक कोल्हे यांनी मंदिरासाठी कोणतीही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे असे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.  गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या पवित्र मूर्तीचे पूजन ब्रह्म वृंदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता तर  अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे बाळासाहेब उर्फ पराग संधान यांचे हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले . 

           कोपरगाव बेट भागात गुरु शुक्राचार्य प्रतिमेची सनई चौघडाच्या निनादात शंख ध्वनी, ढोल ताशाच्या गजरात, फुले पाकळ्यांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक, महिला, शेकडो भक्त साक्षीदार झाले होते, सर्वांनी मिरवणुकीत सहभाग देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.