देशातल्या पहिल्या सीएनजी प्रकल्पाचा शुभारंभ
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : आपल्या देशाला जगात नंबर वन बनवायचे असेल तर देशातील सर्वांनी स्वदेशी अंगीकारली पाहीजे. सीएनजी व पोटॅश खत हे बाहेरच्या देशात मिळते पण कोल्हे कारखान्याने ते तयार करण्याचे नवे ऐतिहासिक प्रकल्प उभे करुन देशातील तमाम सहकारी साखर कारखान्यांना दिशा देण्याचे कार्य केले असल्याचे मत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात केले.

कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांचा देशातील पहीला काॅम्प्रेस्ड बायो गॅस अर्थात सीएनजी प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्यूअल या दोन्ही ऐतिहासिक व देशातील पहील्या सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी दुपारी संजीवनी विद्यापिठाच्या प्रांगणात करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री सहकार तथा गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार राज्य मंञी मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्र्यी राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नितीन कोल्हे, सिंधूताई कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, रेणुका कोल्हे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भानुदास मुरकुटे आदींसह हजारो शेतकरी, नागरी, महीला व विविध क्षेतातील मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह उपस्थितांच्या हस्ते कोल्हे कारखान्याच्या दोन्ही ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे कोल्हे परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना अमित शहा पुढे म्हणाले की, विवेक कोल्हे यांच्या कार्याचा अभिमान वाटतोय की, त्यांनी कोल्हे सहकारी साखर कारखान्यातील टाकाऊ वस्तूपासुन अत्यंत उपयोगी पदार्थ बनवून देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना नवा रस्ता दाखवला आहे. विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हे कारखाना हा नवा प्रकल्प सुरु करुन आदर्श निर्माण करीत तोट्यातील सहकारी साखर कारखान्यांना या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. विदेशात मिळणारे पदार्थ कोल्हेंनी देशात निर्माण केल्याने स्वदेशीला चालना दिली.

देशातला १४० कोटी जनतेने व प्रत्येक व्यापाऱ्यांनी एक निश्चय केला की आम्ही कोणत्याही विदेशी वस्तूंचा उपयोग करणार नाही किंवा व्यापार करणार नाही. असे झाले तर आपल्या लोकशाहीला अर्थीक बळकटी येईल. जागतिक पातळीवर ११ व्या स्थानावरून मोदींनी ४ थ्या स्थावर आणले लवकरच तिसऱ्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर पहील्या स्थावर जायचे असेल तर स्वदेशी शिवाय कोणताही पर्याय नाही. सध्या ग्लोबल वार्मींगचे संकट मोठे आहे तेव्हा पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी धरती मातेला महत्व दिले पाहीजे.

ते पुढे म्हणाले की, देशातील पहीला सहकारी साखर कारखानन्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली, त्यामुळे बदलत्या सहकारातील अर्थीक संकटाला तोंड देण्याकरीता सहकारातील चक्रीय अर्थ व्यवस्था बदलण्याची जबाबदारी महाराष्ट्राची आहे. त्यासाठी केंद्र सरकार साथ देणार आहे कोल्हे यांनी केवळ प्रकल्प टाकला नसुन त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थांची विक्री होण्यासाठी अनेक नामवंत कंपन्यांशी करार करुन कारखान्याच्या चक्रीय अर्थ ववयवस्थेचा नवा आदर्श घालुन दिला आहे. असे म्हणत कोल्हे यांचे खास शब्दात शहा यांनी कौतूक केले. आगामी काळात केंद्रीय पातळीवर १५ निवडक सहकारी साखर कारखान्यांची प्रधान आत्मनिर्भरता प्रकल्पासाठी निवड करून देशातील सहकारी साखर कारखान्यांना बळकटी देण्याचे कार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऐतिहासिक प्रकल्प विवेक कोल्हे यांच्यामुळे उभा राहीला. इथेनाॅल सारखी क्रांती मोदींमुळे झाली. वातावरणातल्या बदलामुळे देशासमोर मोठा प्रश्न पडला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात अतोनात नुकसान झाले आहे. अशा नव्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळणार आहे.

ऐतिहासिक शेतकरी हिताचा प्रकल्प उभारणारे नवव्या क्रांतीचे प्रणेते विवेक कोल्हे आहेत. यातून कोल्हे यांच्यामुळे नवीन व्हिजन भारतात पहायला मिळत आहे. असेही ते म्हणाले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. कोल्हेंनी मनात किंतू परंतु न ठेवता विधानसभेला काळेंचे काम केल्या बद्दल कोल्हेंसह संजीवनी परिवाराचे आभार मानले. तुमच्या मनात जे आहे ते अमित शहा यांच्याही मनात आहे असे सांगून कोल्हे यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत पवारांनी दिले. तसेच पुरग्रस्तांच्या पाठीशी सरकार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आत्मनिर्भर भारत करण्यासाठी प्रयत्न आहे त्यात कोल्हे यांनी नवीन केलेला प्रकल्प आत्मनिर्भरतेचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात उर्जा क्रांती घडणार आहे.बदलत्या युगाचा व वातावरणाचा विचार करुन हा प्रकल्प कोल्हेंनी उभे केल्याबद्दल अभिनंदन करीत कोल्हेंचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी आपल्या प्रास्ताविकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विविध कार्याचा गौरव करुन विविध विषयांची मांडणी केली. या प्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी स्व. कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाच्या कार्याचा आलेख आपल्या भाषणातून व्यक्त केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानत असताना. म्हणाल्या की, आमच्याकडे कोणतेही राजकीय पद नसताना झालेली अलोट गर्दी, पाहुन मी भारुन गेले असं म्हणत त्यांचा कंठ दाटून आला.
