कोपरगाव प्रतिनिधी दि. १६ : कोपरगाव शहरासह तालुक्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर अचानक जोरदार पावसाने झोडपल्याने सजलेल्या बाजारपेठेत ग्राहकासह दुकानदारांची तारांबळ झाली. रस्त्यावर लावलेल्या स्टाॅलमधील अनेकांचा माल पावसाने भिजला तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले.

बुधवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस आला. काही वेळात पाऊस कमी होईल असं वाटत असताना तो पाऊस कमी होण्याऐवजी आणखी जोर धरलाय राञी आठ वाजेपर्य पावसाचा जोर कायम होता. शहरातील अनेक दुकानदारांच्या मालाचे पावसामुळे नुकसान झाले.

रस्त्याच्या कडेला दिवाळी सणाच्या निमित्ताने छोट्या व्यापाऱ्यांनी कर्ज काढुन माल विक्रीसाठी भरला होता. बाजारपेठेत ग्राहकांची नुकतीच गर्दी सुरु झाली आणि मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले. ग्राहक गेले आणि मालही भिजला. हिच अवस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची झाली.

या पुर्वीच्या अतिवृष्टीमुळे शेतातले उभे पिकं आडवे केले. उरलेसुरले पिक काढून त्यातून दिवाळी करण्याची तयारी करीत होते आता परत पाऊस येणार नाही असे वाटत असताना काढणीला आलेला सोयाबीन मका व इतर पिकांचे आजच्या पावसाने पुन्हा धुवून गेले. या वर्षीच्या पावसाने समस्त शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान करण्याचा विडा उचलला आहे की काय अशीच शंका येतेय. निसर्ग कोपल्याची प्रचिती येत आहे अशी भावना शेतकरी वर्गातून होत आहे. तर बाजार पेठेवर सुध्दा त्याचा चांगलाच परिणाम दिसत आहे. अचानक आलेल्या पावसाने कोपरगावकर पुन्हा हैराण झाले आहेत.

ऐन दिवाळीच्या सणाची साफसफाई महीला करीत आहेत. घरातील कपडे, भांडी कुंडी स्वच्छ करून बाहेर वाळायला ठेवलेले असताना अचानक मुसळधार पाऊस आल्याने महीलांची मेहनत वाया गेली सोबत पुन्हा स्वच्छता करण्याचे कष्ट वाढल्याने महीला वर्गातून सुध्दा पावसावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आता नको पाऊस आम्हीची खुप झाली हाऊस.


