कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न,  सभासदांना १५ % लाभांष जाहीर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगांव पिपल्स बँकेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १८ सप्टेबर २२ रोजी बँकेच्या विस्तारीत इमारतीतील सभागृहात उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन सत्येन सुभाष मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चेअरमन मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करून बँकेच्या भविष्यातील प्रगती बाबतची रूपरेषा मांडली व १५ % प्रमाणे सर्व सभासदांना लाभांष मंजूर करण्यात आल्याचे घोषीत केले.

यावेळी व्यासपीठावर बँकेचे विद्यमान चेअरमन सत्येन मुंदडा, व्हा. चेअरमन प्रतिभा शिलेदार व संचालक मंडळ सदस्य कैलासचंद ठोळे, डॉ.विजयकुमार कोठारी, सुनिल कंगले, रविंद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, वसंतराव आव्हाड, सुनिल बंब, रविंद्र ठोळे, हेमंत बोरावके, प्रभावती पांडे, संजय भोकरे, प्रसन्ना काला, व्यवस्थापन मंडळ सदस्य संदीप रोहमारे, विजय नायडू , अभिमन्यु पिंपळवाडकर, धनंजय शेळके, सेवक संचालक, विरेश पैठणकर मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे इत्यादी उपस्थित होते.

सदर सभेमध्ये काही विषयावर केशव भंवर, अजित लोहाडे, प्रदीप नवले व उल्हास गवारे या सभासदांनी सभेत सहभागी होऊन काही प्रश्नांवर चर्चा केली. दि. २२ ऑक्टो. २२ पासून बँक स्थापनेला ७५ वे वर्षे सुरू होणार आहे. या अमृत महोत्सवाची आठवण म्हणुन बँकेने सर्व सभासदांना भेट वस्तु देण्याबाबत बबनराव शिलेदार, अजय शिंदे यांनी सुचना मांडली त्यांच्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे यांनी अभ्यासपूर्ण व समाधानकारक उत्तरे दिली. बँकेचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. असि. जन. मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी बँकेचे मागील सभेचे इतिवृत्तांचे वाचन केले. वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर व्यास, यांनी आभार मानले.