शेवगाव बाजार समिती निवडणुकीसाठी २२० उमेदवारी अर्जांची विक्री, २६ अर्ज दाखल

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि २९ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आज तिस-या दिवशी बुधवारी २६ अर्ज दाखल झाले असून त्यात सोसायटी, मतदार संघातून २०, ग्रामपंचायत व व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी तीन उमेदवारी अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजय कुमार लकवाल यांनी दिली.

Mypage

        बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवार दि.२७ मार्च पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र सोमवारी व मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दोन्ही दिवस निरंक राहिले. बुधवारी सोसायटी मतदार संघाच्या सर्व साधारण विभागातून १३, महिला व इतर मागास विभागातून प्रत्येकी दोन, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाजी विभागातून तीन, तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण विभागातून तसेच व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी तीन असे एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेर २२० उमेदवारी अर्जांची विक्री झाली.

Mypage

      बुधवारी सोसायटी सहकारी संस्था मतदार संघातील सर्व साधारण प्रवर्गातून बाजार समितीचे माजी सभापती अनिलराव मडके, हनुमान पातकळ, मारुतराव थोरात, विजय पोटफोडे, राजेंद्र ढमढेरे, जगन्नाथ मडके, भरत वांढेकर, वसंतराव औटी, भीमराज बेडके, श्रीकिसन जुंबड, प्रसाद पवार, अनिल घोरतळे, गणेश खंबरे, ग्रामपंचायत मतदार संघातून फिरोज पठाण, शरद सोनवणे, राजेंद्र दौंड, सहकारी संस्था मतदार संघातील इतर मागास प्रवर्गातून भास्कर आव्हाड, शेतकरी नांगरे, महिला राखीव प्रवर्गातून चंद्रकला कातकडे, लंका वांढेकर,  व्यापारी आडते मतदार संघातून विठ्ठलराव थोरात, अमोल फडके, जाकीर कुरेशी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी दि.३० रोजी श्रीरामनवमीची शासकीय सुट्टी असून शुक्रवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Mypage