साईगाव पालखी सारखे सामाजिक व धार्मिक सोहळे समाज घडवण्याचे केंद्रस्थान – स्नेहलताताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्रीराम नवमीनिमित्त गेल्या २९ वर्षांपासून श्री साई गाव पालखी सोहळा व कथा सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा खरोखरच स्तुत्य आणि अभिनंदनीय उपक्रम आहे. अशा सार्वजनिक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवाराच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाते. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित श्री साई गाव पालखी सोहळ्यामध्ये आमचा नेहमीच हातभार असतो. यापुढेही अशा उपक्रमांना संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.

श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साई गाव पालखी सोहळ्यांतर्गत यावर्षी नाशिक येथील श्री मातृमंदिर सेवा संस्थानचे प्रमुख प. पू. महंत श्री कालिकानंदजी महाराज यांच्या  आदिशक्ती महात्म्य कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. स्नेहलताताई कोल्हे यांनी मंगळवारी (२८ मार्च) या सोहळ्यात सहभाग घेऊन प. पू. महंत श्री कालिकानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून आदिशक्ती महात्म्य कथा श्रवणाचा लाभ घेतला. 

याप्रसंगी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, गेल्या २९ वर्षांपासून मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साई गाव पालखी सोहळा आयोजित केला जातो. त्यात दरवर्षी असंख्य साईभक्तांच्या उपस्थितीत श्री साईबाबांची पालखी कोपरगावहून शिर्डी येथे नेली जाते. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा श्री साई गाव पालखी सोहळा हा धार्मिक उपक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

पहिल्या वर्षी श्री साई गाव पालखी सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दरवर्षी २४ मार्चला स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचा वाढदिवस मुंबादेवी तरुण मंडळाचे कार्यकर्ते विविध उपक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करत असत. मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने श्री साई गाव पालखी सोहळा जेव्हा शिर्डीला जातो तेव्हा साईभक्तांसाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने गाड्यांचे नियोजन केले जाते. श्री साई गाव पालखी सोहळ्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य असते. यापुढेही अशा उपक्रमांना आमचे कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली.

मुंबादेवी तरुण मंडळाने आयोजित केलेल्या आदिशक्ती महात्म्य कथा महोत्सवामुळे सुंदर असा योग जुळून आला आहे. प. पू. महंत श्री कालिकानंदजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून आदिशक्ती महात्म्य कथेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन त्यांना मोठे बळ मिळत आहे. या कथेच्या माध्यमातून महिलांना आधार देण्याचे, त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे काम केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी महंत श्री कालिकानंदजी महाराज यांचे मन:पूर्वक आभार मानले. कोपरगाव येथे महंत प्रदीपजी मिश्रा यांचा शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्याचा मानस यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन स्नेहलताताई कोल्हे यांनी दिले. 

मुंबादेवी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रम मन लावून जीव ओतून करत असतात.   सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुंबादेवी तरुण मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम सतत सुरू असते. कोणताही उपक्रम सुरू करणे सोपे असते; पण तो उपक्रम सातत्याने राबविणे ही साधीसोपी गोष्ट नाही. मुंबादेवी तरुण मंडळ गेल्या २९ वर्षांपासून श्री साई गाव पालखी सोहळा हा धार्मिक उपक्रम राबवीत आहे हे खरोखरच अभिनंदनीय आहे.

मुंबादेवी तरुण मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी श्री साई गाव पालखी सोहळा तसेच सर्व रोगनिदान शिबीर, ध्वजारोहण, भक्ती फेरी, गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नव वर्षानिमित्त आकर्षक अशी महिलांची मोटारसायकल रॅली असे विविध उपक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या कथांचे आयोजन केले जाते. यावर्षी भव्य दिव्य आदिशक्ती महात्म्य कथा महोत्सवाचे आयोजन केले आहे. श्री साई गाव पालखी सोहळा मागील २९ वर्षांपासून आयोजित करून कोपरगावकरांना अध्यात्मिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाचे स्नेहलताताई कोल्हे यांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरीजी महाराज, साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाचे संतोष चव्हाण, सुनील फंड, संजय जगताप, मनोज कपोते, राजेंद्र खडांगळे, राजेंद्र कपोते, राजेंद्र माळी, संदीप दळवी,सुनील खैरे, अरविंद मंडलिक,विशाल उदावंत,सुनील मोरे,विवेक फंड,राहुल पांडे,गोपाळ वैरागळ,भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सौ. वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका सौ. विद्याताई सोनवणे, सौ. दीपाताई गिरमे, सौ. हर्षाताई कांबळे, खालिकभाई कुरेशी, प्रसाद आढाव, विक्रांत सोनवणे, विजय चव्हाणके आदींसह भाविक व मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

कोणत्याही कार्यक्रमात राजकीय नेते उपस्थित असले की, त्यांचा वेगळाच शिष्टाचार असतो. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर काही नेते कसलेही भान न ठेवता राजकीय भाष्य करत असतात; व धार्मिक मंचाचा वापर राजकीय मनोगत करण्यासाठी करतात पण स्नेहलताताई कोल्हे यांनी धार्मिक ठिकाणी कसे वर्तन असावे याचा आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला आहे. आदिशक्ती महात्म्य कथा सोहळ्यात स्नेहलताताई कोल्हे यांनी कसलाही बडेजाव न करता साधेपणाचा प्रत्यय दिला. या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना त्यांनी कसलेही राजकीय भाष्य केले नाही. मनोगत व्यक्त केल्यानंतर त्यांनी समोर उपस्थित महिला भाविकांमध्ये बसून आदिशक्ती महात्म्य कथा श्रवणाचा लाभ घेतला. स्नेहलताताई कोल्हे यांच्या साधेपणाचे उपस्थित सर्वांनी कौतुक केले.