कोपरगावच्या विकास वैभवाचे शिल्पकार, आमदार आशुतोष काळे

केवळ बोलून पुढे चालणाऱ्यापैकी नाही तर जे बोलले ते करून दाखवले असा नवा इतिहास निर्माण करून कोपरगाव मतदार संघातील गावागावात आणि घरा घरा पर्यंत विकास वैभवाची लाट निर्माण करणारे आमदार आशुतोष काळे हे कोपरगांवच्या विकास वैभवाचे शिल्पकार आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी आहोराञ  धडपड करून जनकल्याणाची कामे मार्गी लावण्यात आमदार आशुतोष काळे हे अग्रभागी असतात. कर्मवीर  स्व.शंकरराव काळे यांच्या विचारांचा वसा व वारसा चालवणारे आशुतोष काळे हे केवळ राजकारणामध्ये सक्रीय आहेत म्हणून नाही तर राजकारणाच्या पलीकडे जावून स्व.‌काळे यांचे विचार प्रत्यक्षात कृतीतून दाखवत आहेत.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाचे वटवृक्षात रूपांतर करीत आहेत. रयतेच्या कल्याणासाठी कार्य करणारे रयतेचे सेवक आशुतोष काळे यांनी पदाला महत्व न देता पदोपदी जनसेवा करीत आहेत. म्हणुनच जनतेच्या मनामनात काळे यांच्या प्रति विशेष आदरभाव आहे. सर्वसमावेशक जीवन जगणारे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नावर विषेश लक्ष दिल्याने अवघ्या काही दिवसांत कोपरगावकरांची पाण्याची समस्या सोडवण्यात यशस्वी होत आहेत. 

‘ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तोपर्यंत आपण त्यांच्याकडे सकारात्मकतेनं पाहायला हवं, प्रामाणिक प्रयत्नांची कास धरायला हवी, त्यावेळी तुमच्या सकारात्मक ऊर्जेला, आणि प्रामाणिक प्रयत्नांना न्याय हा मिळतोच. सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न केले की यश आपोआप चालत येतं. या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांचा वारसा व काळे परिवाराच्या समाजकारणाचा वसा घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात आमदार आशुतोष काळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  कोपरगाव विधानसभा मतदार संघ पुन्हा विकासाच्या नव्या वाटेवर आणायचे स्वप्न उराशी बाळगून आमदार  काळेंनी केलेले प्रयत्न आणि पाठपुरावा वाखाणण्याजोगा आहे. केवळ साडे तीन वर्षात २००० कोटीचा निधी खेचून आणण्याची किमया काळे यांनी करून दाखवली. सध्या कोपरगाव मतदार संघाचा बदललेला चेहरा मोहरा ही त्याची साक्ष देतोय. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढाईत विजय मिळवून सन २०१४ च्या पराभवाचा वचपा विरोधकांकडून सव्याज वसुल करीत २०१४ ला झालेला पराभव हा एक अपघात होता हे दाखवून दिले. जनतेचे आशीर्वाद आणि मतदार संघाची विकासाच्या बाबतीत नवनिर्मिती करून ‘विकासाचं किमयागार’ व्हावं हि खुणगाठ मनाशी बांधून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून आशुतोष काळेंनी जनतेच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. 

कोपरगाव मतदार संघाचा विकास नजरेत भरणारा असून अनेक प्रलंबित असणारे व भल्या भल्यांना न सुटणारे प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी मागील साडे तीन वर्षात सोडविले आहेत. या प्रश्नांपैकी एक प्रश्न अतिशय ज्वलंत होता तो प्रश्न म्हणजे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न. या प्रश्नाबाबत त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास केल्यामुळे त्यांना हा प्रश्न कसा सोडविता येईल याची पूर्णपणे कल्पना होती. परंतु हि कल्पना सत्यात उतरवण्यासाठी गरज होती एका संधीची आणि ती संधी २०१९ ला मिळाली आणि मतदार संघाच्या जनतेचे भाग्य एवढे मोठे की, पहिलीच टर्म असणारे आशुतोष काळे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आणि मतदार संघाच्या विकासासाठी हा दुग्धशर्करा योग ठरला.

कष्ट, त्याग, हाती घेतलेले काम तडीस लावण्याचा हातखंडा हे गुण उपजतच अंगी असणाऱ्या आशुतोष काळेंनी अशा संधीचे सोने करतांना आपला ड्रीम प्रोजेक्ट अर्थात कोपरगांव शहराच्या पाचव्या  साठवण तलावाचे काम पहिल्या दोनच महिन्यात प्रारंभ करून आश्वासक सुरुवात केली. मतदार संघाच्या विकास पर्वाला सुरुवात केल्यापासून त्यांनी आजपर्यंत मागे वळून कधी  पाहिलेच नाही. आमदार काळे यांच्या दूरदृष्टीमुळे कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची बुलेट ट्रेन सध्या सुसाट सुटली आहे. या ५ नंबर साठवण तलावासाठी आशुतोष काळेंनी १३१.२४ कोटी निधी आणला असून सद्य स्थितीत ५ नंबर साठवण तलावाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. येत्या काही महिन्यात कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे हि गोष्ट कोपरगाव शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाणार आहे. आमदार काळे यांना कोपरगावची भावी पिढी साठवण तलावाचे जनक म्हणून संबोधले जाणार. कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहणारे ऐतिहासिक काम आशुतोष काळे यांनी  केले आहे. 

कोपरगाव मतदार संघाची अवस्था पुर्वी अतिशय दैनिय होती. फुटलेले रस्ते, कोपरगाव शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी वणवण, आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला, विजेच्या समस्याने नागरी ञस्त  झाले होते. अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात मतदार संघ अडकलेला होता.अशा बिकट स्थितीत मतदार संघ असतांना मतदार संघाच्या विकासाची सूत्र जनतेने ज्या विश्वासाने आशुतोष काळेंच्या हातात दिली त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेवून मतदार संघाच्या विकासाला त्यांनी वाहून घेतले आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांची सांगड घालून आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मतदार संघात वाहणारी विकासाची गंगा आज दारोदारी वाहत आहे. 

आशुतोष काळेंच्या प्रामाणिक प्रयत्नांचे विकास वैभवाची फळं मतदार संघातील नागरीकांना मिळत आहेत.  मतदार संघाच्या रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्याचे मोठे आव्हान लीलया पेलतांना त्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यातून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तब्बल २६१ कोटी निधी आणला आहे. या निधीतून अनेक महत्वाच्या रस्त्यांचे काम पूर्ण होवून नागरिकांची रस्त्यांची डोकेदुखी आ. आशुतोष काळेंनी दूर केली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदार संघातील सर्वच रस्ते चकाचक झाले आहेत. त्याच बरोबर अनेक छोट्या मोठ्या पुलांसाठी देखील निधी देवून हे प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे मागील चार वर्षापूर्वी कोपरगाव मतदार संघात येवून गेलेली व्यक्ती मतदार संघाचे विकासाच्या बाबतीत बदलेले रूप पाहून आश्चर्यचकित होत आहे.

ज्याप्रमाणे कोपरगाव शहराची तहान भागविण्यासाठी आशुतोषदादांनी पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणेच मतदार संघातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी  जवळपास ७० गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी  आजपर्यंत २७० कोटी निधी आणला आहे. या निधीतून अनेक पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण झाले असून बहुतांश पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या ७० गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आशुतोष काळे यांनी कायमचा उतरविला आहे.

आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. त्यामुळे कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा असतो त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आशुतोष काळेंनी  मतदार संघाचा विकास करून दाखवत मतदार संघाच्या विकासाला दिलेल्या आकारातून विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. यामध्ये शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न देखील मार्गी लावतांना ३०० कोटी निधीस मंजुरी मिळविली असून कालव्यांच्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. हि कामे पूर्ण होताच गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तन काळात सिंचनाच्या वेळी येणाऱ्या अडचणी कायमच्या दूर होणार आहेत.

त्याप्रमाणे विजेचा प्रश्न सोडवितांना देखील सिन्नर तालुक्यातील शहा येथील १३२ के.व्ही. वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव,चासनळी आदी वीज उपकेंद्र जोडली जावून  त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने  वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होवून कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी होणार आहे. मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे मंजूर करून घेतलेल्या नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लाखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे बहुतांश प्रमाणात मतदार संघाच्या विजेच्या समस्या दूर होवून त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.

आरोग्याच्या बाबतीत देखील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळवत २८.८४ कोटी निधीस मंजुरी मिळविली आहे तसेच संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देवून कर्मचारी निवसथानासाठी २२.६८ कोटी, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत ३ कोटी, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प २ कोटी, ग्रामीण कोपरगाव रुग्णालयाला अद्ययावत साहित्यासाठी १.५ कोटी, ५० बेडच्या ऑक्सिजन कोविड कोविड केअर सेंटरसाठी १ कोटी, कोपरगाव शहरात ३ अर्बन हेल्थ सेंटरला व आपला दवाखाना मंजूर, तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मान्यता अशा प्रकारे आरोग्य व्यवस्था देखील बळकट केली आहे.

अशी अनेक विकासकामे पूर्ण करून जनतेला ज्या विकासाची अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण होवून कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत पुढे घेवून जाण्यात आशुतोष काळेंना यश मिळत आहे. असे यश प्रत्येकांना  मिळत नाही. त्यासाठी शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द अंगी असावी लागते. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. हे सर्व गुण उपजतच अंगी असल्यामुळे व सोबतीला काळे परिवाराची समाजकारणाच्या बांधिलकीची प्रेरणादायी विचारांची शिदोरी असल्यामुळे कोपरगावच्या विकासाचे शिल्पकार ठरले आहेत.

भविष्यात कोपरगाव मतदार संघाचा अधिक विकास होणार असून एम.आय.डी. सी., आय टी. हब निर्माण करण्याचा त्यांचा मानस असून विमानतळ व  मतदार संघातून जात असलेला समृद्धी महामार्ग, जगद्विख्यात श्री साईबाबा देवस्थान त्यामुळे कोपरगाव केंद्रस्थानी आले असून त्या माध्यमातून मतदार संघाचा जास्तीत जास्त विकास साधण्याचा आशुतोषदादांचा प्रयत्न आहे. जनतेचे आशीर्वाद काळे परिवाराची खरी ताकद आहे. जनकल्याणासाठी अविरत कार्य करणारे  विकास वैभवाचे शिल्पकार आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना साईबाबा कायम यश देवो हीच इच्छा. आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातील जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!