पवार पतसंस्थेला पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातील प्रथम पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोळपेवाडी-सुरेगाव परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना गरजेच्या वेळी आर्थिक बळ देण्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी स्थापन केलेल्या व मा.आ.अशोकराव काळे तसेच आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सहकारी पतसंस्था क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब ना.स.पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागातील प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा नाशिक विभागाच्या वतीने ०५ कोटी ते ५० कोटीच्या ठेवी गटातील पतसंस्था मध्ये  पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला हा प्रथम पुरस्कार कर्नाटक राज्यातील कुमटा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात माजी सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, संचालक अनिल महाले, मॅनेजर मंगेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला.त्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे तसेच आ.आशुतोष काळे यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

या पूर्वीही पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला सलग दोन वर्षे बँको ब्लू रिबिन पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेचे भागभांडवल वाढीचे प्रमाण, ठेवी वाढीचे प्रमाण, उत्पन्न व खर्चाचे प्रमाण, अनुत्पादक कर्जाचे प्रमाण,सि. आर. आर., एस. एल. आर., सि.आर.ए.आर. या व इतर अनेक बाबतीत संस्था सहकार खात्याच्या नियमांचे सातत्याने तंतोतंत पालन करीत आहे. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचा विश्वास वाढत असून संस्थने चालू वर्षी सप्टेंबर अखेर रु.५० कोटींचा टप्पा पार केला आहे. ग्राहकांसाठी लॉकर सुविधा, डिजिटल बँकिंग सुविधा व नियमितपणे १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

पतसंस्थेने उल्लेखनीय प्रगती करतांना संस्था व्यवस्थापन, कर्जवाटप, सभासद सेवा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये आपला ठसा उमठवला आहे. ही संस्था ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचतगट, लघुउद्योजक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्कृष्ट पतसेवा पुरवते. संस्थेने पारदर्शक प्रशासन, कार्यक्षम व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि लोकाभिमुख उपक्रमांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हा पुरस्कार म्हणजे संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची आणि आर्थिक प्रगतीची पावती आहे. या सन्मानामुळे संस्थेच्या संचालक मंडळाला नवीन ऊर्जा मिळाली आहे. मा.आ.अशोकराव काळे तसेच आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अधिक पारदर्शकता, शिस्तबद्ध व्यवहार आणि जनहित केंद्रस्थानी ठेवून काम करणार असल्याचे संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply