कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आव्हानात्मक परिस्थितीतून पुन्हा उभारी घेत प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असलेल्या गौतम सहकारी बँकेने याहीवर्षी दिवाळी पूर्वीच लाभांश सभासदांच्या बँक खात्यात जमा केला असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कारखाना कर्मचारी, कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व छोटे मोठे व्यावसायिक यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी गौतम सहकारी बँकेची स्थापना केली.

काही वर्षापूर्वी अडचणी निर्माण झालेल्या अडचणीतून यशस्वीपणे बाहेर पडून सहकारी बँकिंग क्षेत्रात गौतम बँक प्रगतीची शिखरे पार करीत आहे. यामागे मा.आ.अशोकराव काळे यांची साथ व आ.आशुतोष काळे यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी सांगितले आहे.

कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा वेळेत भागवणा-या गौतम बँकेने स्पर्धेच्या युगात निर्माण झालेली कॅशलेस व्यवहार प्रणाली आणि त्या अनुषंगाने डिजीटल बँकिंग प्रणालीचे वाढलेले महत्व हे नागरी बँकांसाठी मोठे आवाहन असतांना राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत सर्व प्रकारच्या सेवा सुविधा गौतम बँकेकडून ग्राहकांना दिल्या जात आहे.

सुधारित बँकींग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ हा सन २०२० मध्ये सहकारी बँकामध्ये सुधारणा करण्याचे दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सहकारी बँकिंग कायद्यामध्ये अमुलाग्र बदल झालेला असून नागरी बँकांनी कायद्यांमधील तरतुदीनुसार काटेकोरपणे कामकाज बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी रिझर्व बँकेच्या नियमांप्रमाणे कामकाज करीत आहे. ग्रामिण भागातील अर्थ व्यवस्था सुधारणेसाठी गौतम बँकेने आपली भुमिका अत्यंत सक्षमपणे निभावली हे सहकार चळवळीच्या दुष्टीने नक्कीच अभिमानास्पद असल्याचे चेअरमन संजय आगवण यांनी सांगितले आहे.


