केंद्र व राज्य शासनाने शेतक-यांना ५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा करावा – कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे, अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, खरीप हंगाम पुर्णपणे उध्दवस्त झाला, रब्बीचेही नियोजन बिघडले तेंव्हा केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाख रूपयापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठयासह खते, बी-बीयाणे व किटकनाशकांच्या किंमती नियंत्रीत ठेवाव्या तरच शेती, शेतकरी वाचेल आणि सहकाराचा कणा मजबुत होईल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. येत्या चार वर्षात अहिल्यानगर-नाशिक विरूध्द मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद कायमचा मिटविण्यांसाठी तुटीच्या उर्ध्व गोदावरी खो-यात जास्तीचे पाणी वाढवुन त्याअनुषंगाने असलेले सर्व प्रकल्प येथील लोकप्रतिनिधीने मार्गी लावावे असेही ते म्हणांले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरूवारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संचालक विलासराव वाबळे, सौ रूपालीताई वाबळे या उभयतांच्या व सर्व संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

            प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाचा पाया मजबुत करून सहकारी साखर कारखानदारीत अमुलाग्र बदल घडविले. उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली युवा अभ्यासुनेते विवेक कोल्हे यांनी यंदाच्या हंगामात आवश्यक तेथे आधुनिक बदल घडवत गाळप क्षमतेत सुधारणा केली असुन या हंगामात साडेसात ते आठ लाख मे. टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यांत आले आहे. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, सर्व संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

युवानेते विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, शेतक-यांचे दरडोई उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातुन त्याच्यापुढे समस्यांचा डोंगर उभा आहे, म्हणून त्याची मानसिकता आंदोलनात्मक होतांना दिसत आहे. शेतक-यांची आर्थीक समृध्दी वाढावी, त्यांची क्रयशक्ती वाढावी यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अभिप्रेत असणारी शेती करून सहकारातुन शाश्वत समृध्दी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासमोर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त संजीवनीच्या प्रत्येक स्थित्यंतरातुन घडविलेल्या विकासात्मक कार्याचे सादणीकरण करून पुढील पंचवीस वर्षासाठीच्या सहकार बळकटीसाठी सुयोग्य धोरणांची अंमलबजावणी व्हावी असे सांगत ज्या खाजगी विरूध्द येथील शेतक-यांनी लढा देत सहकार जोपासला आता मात्र पुन्हा सहकार क्षेत्रावर मोठे घाव पडुन खाजगी कारखानदारी फोफावत असल्याचे दुर्दैव आहे. ऊस दरात संजीवनी कधी मागे राहिलेला नाही.  आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदींने लढवुन त्यात प्रत्येकांत विजय संपादन करायचा आहे असेही ते शेवटी म्हणांले.

बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, यंदाच्या मोसमात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले, अजुनही पाऊस थांबायला तयार नाही. रब्बी बरोबरच ऊसशेती धोक्याची झाली आहे. पावसामुळे शेतात गाळ मोठया प्रमाणांत आहे त्यामुळे अजुन पंधरा दिवस उशिरांने गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. एफआरपीच्या तुलनेत साखर विक्रीचे दर केंद्र शासनांने वाढवावे म्हणजे साखर कारखानदारांना त्यातुन काहीसा दिलासा मिळेल. उलट साखर १०० रूपयांनी खाली आली आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करत ग्रामिण अर्थकारणाचा पाया मजबुत करून येथील शेतकरी ख-या अर्थाने समृध्द करण्यासाठी १९७२ मध्येच सहवीज, हायड्रोजन ऊर्जा, आसवनी व त्यावर आधारीत विविध रासायनिक उपपदार्थ, बायोगॅस, ऊसाच्या रसापासुन थेट इथेनॉल निर्मीती, पोटॅश ग्रॅन्युएल खत, बायोगॅसवर आधारीत सहवीज, पॅरासिटामॉल औषध प्रकल्प यासह विविध प्रकल्पांचा पाया ५३ वर्षापुर्वीच घातला.,

सहकार जोपासला, टिकवला, वाढविला. रोटी-कपडा-मकान घोषणा दिली पण त्यात शेतकरी नागविला गेला. आज त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. शेतकरी सावरला, त्याची शेती व्यवस्थीत राहिली तरच त्यावर अवलंबुन असणारे अर्थकारण सुरळीत होते पण आज खते, बी-बीयाणे, किटकनाशकांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, शेतक-यांच्या आत्महत्या जास्त होत आहे तेंव्हा केंद्र व राज्य शासनांने सहकाराचा मुख्य कणा शेतकरी असुन त्याच्या समृध्दतेसाठी खते, बी-बीयाणे, किटकनाशके यांचे दर नियंत्रीत करून त्यात रेशनींग पध्दतीने सुरळीतपणा आणावा व पाच लाख रूपयापर्यंत त्यांच्या शेतीला बिनव्याजी कर्जपुरवठा करावा असे ते म्हणांले. 

 याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, नितीनदादा कोल्हे, गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, डॉ. एकनाथ गोंदकर, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, त्र्यंबकराव सरोदे, पराग संधान, अरूण येवले, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, त्र्यंबकराव परजणे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलास माळी, निवृत्ती बनकर, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, सतिष आव्हाड, संदिप चव्हाण, प्रदिप नवले, मोहनराव वाबळे, वाल्मीक भास्कर, डॉ. गुलाबराव वरकड, फकिरराव बोरनारे, साहेबराव रोहोम, नवनाथ आगवण, राजेंद्र बागुल, मच्छिंद्र टेके, कामगार नेते मनोहर शिंदे, भिमराव भुसे, रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी, विनोद राक्षे, मच्छिंद्र लोणारी,

राजेंद्र लोणारी, दत्तात्रय मोरे, मनोज अग्रवाल, रविंद्र नरोडे, बाळासाहेब नरोडे, गणेश आढाव, केशव भवर, शरद थोरात, राजेंद्र परजणे, दत्ता काले, सोपानराव पानगव्हाणे, दिलीप दारूणकर, विजय रोहोम, संभाजीराव रक्ताटे, अनिल बनकर, महेंद्र काले, वैभव आढाव, यादवराव संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, संजय तुळस्कर, रामदास काळे, विक्रम पाचोरे, मुकूंद काळे, कैलास खैरे, बापूतात्या परजणे, महेश परजणे, संतोष दवंगे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थाचे संचालक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक मनेष गाडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संचालक विश्वासराव महाले यांनी केले.

Leave a Reply