कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील, सुनील कुंढारे, अविनाश मेहरे, शिवा पंडोरे, बाबा मेहरे तसेच रामायण ग्रूप, कोपरगांव मधील सुमारे 50 ते 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

या प्रभावी नेतृत्वांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरगांव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, व्यापक जनसंपर्काचा आणि स्थानिक प्रभावाचा उपयोग आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठी राजकीय गती आणि निर्णायक विजय मिळवण्यासाठी निश्चितपणे होईल. यावेळी, सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी परागसंधान, दिलीपराव दारुणकर, अविनाश पाठक, रवींद्र पाठक, संतोष गंगवाल, अशोकराव लकारे, संतोष साबळे, संतोषआप्पा चव्हाण, सचिन गंगुले, मच्छिंद्र शार्दुल, मुकेश डिंबर, अमित आढाव, सनी रमेश वाघ, श्री कैलास मंजुळ, श्री अमित आढाव, अभि मंजुळ, सुनील कुंढारे, अविनाश मेहेरे, शिवा पंडोरे, बाबा मेहेरे, प्रमोद अहिरे, प्रशांत कुंढारे, विकी पंडोरे, गणेश पंडोरे, निलेश डिंबर, अजय पन्हे, भाऊसाहेब लकारे, राकेश गहिरे, रोहित पंडोरे, विजय सूर्यवंशी, गणेश मुंढरे, आकाश कुंढारे, नितेश गहिरे, विजय पन्हे, विजय कराळे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


