कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी कमळावरच – महसूल मंञी बावनकुळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ :  जशी लक्ष्मी देवी कमळावर उभारली आहे तशीच कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुध्दा कमळावरच आहे असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरगाव नगरपालीका निवडणुकीच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे भाजप आरपीआय व मिञ पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले तर कोपरगावचा विकास होणार आहे असे म्हणाले. कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकतील भाजप, आरपीआय व मिञ पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व  प्रभाग निहाय नगरसेवक  पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाली.

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान, दिलीप दारुणकर, नितीन दिनकर, निसार शेख, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, विजय आढाव, दिपक वाजे, दिपक गायकवाड, केशव भवर, दत्तोपंत जगताप,आरिफ कुरेशी, विश्वास महाले, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, विनोद राक्षे, विजय वाजे, पोटे यांच्यासह  नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मंञी बावनकुळे पुढे म्हणाले कि, कोल्हे परिवार जनतेच्या विकास कामासाठी अहोरात्र कार्य करत असतात. पदावर नसले तरीही ते जनतेसाठी मंञालयाच्या पायऱ्या चडतात तेव्हा विकासाची चार चाकाची गाडी कोपरगाव नगरपालीकेच्या समोर उभी आहे. एक चाक पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनेचे, दुसरे चाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास योजनेचे तिसरे चाक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर चौथे चाक माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासचे आहे त्या चारचाकी विकासाच्या गाडीला पेट्रोल टाकण्याची जबाबदारी माझी आहे. कोपरगावच्या विकासाची चारचाकी गाडी घेवून मंञालयात जाण्यासाठी पराग संधान यांना निवडून देवून एक चांगला ड्रायव्हर गाडीत बसवला तर ती थेट मंञालयात पोहणार आहे. संधान सांगितील ते विकासाचे काम करण्याची जबाबदारी आमची आहे.

शहरातील खडकी, लक्ष्मीनगर, संजय नगर, सुभाष नगर, टाकळी नाका, येवला रोड, महादेव नगर, हनुमाननगर, गांधीनगर, दत्तनगर, गोरोबानगर, गजानन नगर हनुमाननगर, १०५, लिंबारा मैदान, एस जी विद्यालय परिसर, टिळकनगर, इंडोरगेम हाॅल परिसरासह विविध शासकीय जागेत घरे असणाऱ्यांची अंदाजे ५ हजार घरे कायमस्वरूपी मालकीचे करून घराचे उतारे नावे करणार आहे. निवडणुकीत भाजपला विजयी केल्यानंतर मी स्वतः सर्वांचे उतारे नावे करून माझ्याच हस्ते वाटप करायला येणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित सर्वांनी बावनकुळे यांचे टाळ्यांच्या गजरात विशेष स्वागत केले. ते पुढे म्हणाले की, केवळ घरे नावावर करून थांबणार नाही तर ५ हजार घरे पंतप्रधान आवास योजनेतून पक्के बांधून देणार असल्याचे सांगितले. पराग संधान व कोल्हे परिवाराने  कोपरगावच्या विकासाचे जे जे  काम सांगितले ते मुख्यमंत्री व महसूल मंत्री म्हणून मी पुर्ण करणार असल्याचे अभिवचन बावनकुळे यांनी दिले. 

 विकासाची संकल्प पुरतीची  निवडणूक आहे.  विकसीत कोपरगाव २०२९चा आराखडा केला आहे. विश्वासनाम्याला जितका निधी लागेल तितका देणार आहे.  पुढचा विकास आराखडा पराग संधान तुम्ही घेवून या मी व मुख्यमंत्री मदत करणार. तसेच राज्याच्या  इतिहासात प्रथमच तुकडे बंदी कायद्यामुळे राज्यातील ७ लाख घरांना  तुकडे बंदीतून घरे नावे करून देणार. वर्ग दोनच्या जमीनी सर्व अटी बाजुला सारुन नावे करणार. आता एनए ची गरज नाही. घराचा नकाशा बनवा त्वरीत बांधकाम करा. कोपरगावला नक्षा योजना मध्ये घेणार. संपूर्ण घरांचे सर्वेक्षण नकाशा आम्ही करणार. असा नकाशा बघताच पुढच्या पाचव्या पिढीला सुध्दा  घराचा नकाशा स्पष्ट दिसेल. या नक्षा योजनेतून कोपरगावकरांना मोफत नकाशा काढून देणार. असेही शेवटी ते म्हणाले .

यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महीलांच्या हक्काचे घर नावे करा मी आपल्याला पदर पसरुन मागणी करते असे म्हणत बावनकुळे यांच्याकडे स्नेहलता कोल्हे यांनी मागणी केली. उर्जा मंत्री असताना बावनकुळे यांनी कोपरगावच्या विजेचा प्रश्न  कायमस्वरूपी मार्गी लावल्या बद्दल कोल्हे यांनी बावनकुळे यांचे आभार मानले. अनेकांची घरे नावावर नाहीत ते नावे करण्याची व्यवस्था केली आहे असे म्हणत बावनकुळे  यांच्याकडे विविध विकास कामांची मागणी केली.

नगराध्यक्ष पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार काका कोयटेवर कोल्हेंनी निशाणा साधताना म्हणाले की, माझ्यावर त्यांनी बाई म्हणून एकीरी उल्लेख केला. हो मी बाई असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी अहिल्या आहे, जनमाणसांसाठी लढणारी  मी सावित्री आहे असे म्हणत विरोधक मला महीला म्हणून एकेरी उल्लेख केल्या बद्दल खंत व्यक्त करु कोयटे यांना त्या म्हणाल्या की, त्यांनी  या पुर्वी राज्यातील मोठ्या लोकांना फसवले आता कोपरगावच्या गोरगरीब लोकांना फसवण्याचे काम कोयटे विविध अमिष दाखवून करीत आहेत असे म्हणत आमदार काळेसह कोयटेवर निशाणा साधला .

  विवेक कोल्हे म्हणाले, चार वर्षात आमदार व मुख्याधिकारी यांची एक हाती सत्ता असताना विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार केला विकास कुठेच नाही. ३०० दिवसात केवळ ६३ दिवस पाणी पिण्यासाठी दिले. कुठेही स्वच्छता नाही, स्वच्छ पिण्यासाठी पाणी नाही. पाण्याच्या शुद्धीकरण केंद्रावर पाण्यात मृत जनावरे पक्षी मरुन पडलेले दिसले. हि निवडणूक जनतेने व कार्यकर्त्यांनी आता हाती घेतली आहे.  चार हजार कोटी खर्च केल्याच्या गप्पा करतात, पण प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही. सत्तेत नसतानाही जनतेचे कामं आम्ही केले. विश्वासनामा हा प्रत्यक्षात उतरवणार आहोत असे म्हणत आमदार काळे यांच्यावर  जोरदार शब्दात निशाणा साधला.

 शिर्डी कोपरगाव एमआयडीसी नावाने असावी. बेरोजगारांना रोजगार मिळावा. पाणी प्रश्न, शहरातील बहुतांश उपनगरातील नागरीकांचे उतारे नावे व्हावे अशी कळकळीची मागणी  कोल्हे यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली.  यावेळी पराग संधान म्हणाले, प्रचंड गर्दीमुळे ही विजयी सभा झाली आहे.  पालीकेत शंभर दिवसात शंभर विकास कामे करणार आहोत. सत्ता ब वर्ग जमिनी संदर्भात स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे अनेकांना जमीनी, घरे नावे होणार आहेत. शहराच्या अनेक समस्यावर लक्ष वेधले. आता जनतेच्या सेवेसाठी दारावर जावून काम करणार आहोत. नागरीकांना नगरपालीकेत चकरा मारायची गरज लागणार नाही.  याप्रचार सभेने कोपरगावचे लक्ष वेधले या सभेला नागरीकांची विक्रमी गर्दी झाली होती. 

Leave a Reply