सुरेगाव सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी ग्रामिण भागातील सहकार चळवळ अधिक मजबुत करण्यांसाठी जी पावले उचलली ती विधायक असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे यांनी केले.

तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगांव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणांत संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. प्रारंभी अध्यक्ष प्रशांत वाबळे यांनी सुरेगांव सोसायटीच्या अहवाल सालातील वैशिष्टयपूर्ण बाबींची माहिती दिली. उपाध्यक्ष शंकरराव कचरू कदम म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्यात सहकारी संस्थाचे रोपटे लावून त्याचा वटवृक्ष केला आहे. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यात आले. अहवाल वाचन सचिव शांताराम सुकदेव कदम यांनी केले.

विलास वाबळे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळते. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सुरेगांव सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के कर्ज बार होण्यासाठी यांनी विशेष लक्ष देऊन सूचना केल्या. दोन वर्षांत संस्था प्रगतीपथावर आणु. संस्थापातळीवर ९१ टक्के वसूल झाला आहे.

सहकार हा ग्रामिण अर्थकारणाचा मुळ केंद्रबिंदु आहे. त्याच्या वाढीतुन सभासद शेतक-यांबरोबरच परिसराचा देखील विकास होत असतो सुरेगाव सोसायटीस व्यक्तीगत पातळीवर आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक कोपरगाव शाखेचे विकास अधिकारी काटे, बँक निरीक्षक गाडे यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी सर्वश्री मोहन वाबळे, भागवत कदम, दामु सर्जेराव कदम, यशवंत निकम, छबुराव माळी, गोरख केशव कदम, उत्तम निकम, शांताराम मेहेरखांब, दिपक हुडे, यांच्यासह सभासद शेतकरी सुरेगांव पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत आदि उपस्थित होते. शेवटी सचिव शांताराम सुकदेव कदम यांनी आभार मानले.