विवेक कोल्हे दूरदृष्टी असलेला युवा नेता – राम शिंदे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : अतिशय कमी वयात  दूरदृष्टी असलेला युवा नेता म्हणून विवेक कोल्हे यांनी आपल्या कामाची  चुणुक दाखवत नगराध्यक्षासह १९ नगरसेवक निवडून आणुन कोपरगावमध्ये प्रथमच भाजपचा नगराध्यक्ष केला तसेच स्नेहलता कोल्हे ह्या यापुर्वीही कोपरगावच्या प्रथमच भाजपच्या आमदार झाल्या. जनतेच्या कल्याणासाठी तडजोड करणारा युवा नेता विवेक कोल्हे आहेत म्हणूनच थेट अमित शहा यांचा आशीर्वाद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा कोल्हेंना आहे असे मत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत  प्रथमच भाजप व मिञ पक्षाची एकहाती सत्ता आल्याने  नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान व सर्व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ अर्थात सेवा शपथ सोहळा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तहसील मैदानावर संपन्न झाला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, संजीवनी संयसाहयता महीला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे,नुतन नगराध्यक्ष पराग संधान,गटनेते प्रसाद आढाव, अॅड रविंद्र बोरावके, अॅड जयंत जोशी, डॉ. राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, सचिन तांबे, दत्तोपंत जगताप, शिवाजी गोंदकर राजेश ठोळे, प्रसाद नाईक, दिपक वाजे यांची प्रमुख उपस्थिती होती 

 यावेळी  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नुतन नगराध्यक्ष पराग संधान व भाजपचे वाजयी सर्व नगरसेवक नगरसेविका यांना सामुदायिक पद व गोपनीयतेची शपथ दिली. मान्यवरांच्या हस्ते नगराध्यक्ष पराग संधान विजयी  नगरसेवक, नगरसेविका  तसेच भाजपचे  पराजय झालेल्या नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संजीवनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी बोलताना राम शिंदे  पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष पराग संधानसह नगरसेवक यांनी शपथ घेतली असा हा कार्यक्रम राज्यात प्रथमच झाला.  निवडणूक आलेला नगराध्यक्ष व नगरसेवक कसे असावा ते कोपरगावमध्ये पाहायला मिळाले. निलडून आल्यानंतर हारतुरे घेण्या ऐवजी अवघ्या १५ दिवसात कामाला लागेले. युवा नेते विवेक कोल्हे यांचा विश्वासनामा पुर्तीसाठी हा अगळा वेगळा शपथविधी जनसेवेचा आहे. दिलेल्या वचन नाम्याचा आहे.

विवेक कोल्हे यांनी नगरपालीकेच्या  कामकाजाचे मोबाईल द्वारे अॅप तयार करुन  जनतेसाठी सोपे काम  आहेत यावरून विवेक कोल्हे हे दूरदृष्टी नेतृत्व असलेला नेता आहे. विवेक कोल्हे कमी वयाचे असुनही विधानसभेच्या निवडणुकीत दोन पावले मागे घेवून  आपल्या पक्ष  निष्ठेची पावती दिली. इतका समजुतदार व परिपक्वता कुठून आली ?  तर स्व. शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून जनतेचे हित करण्याचे सिध्द करीत अतुलनीय कार्य करीत असल्याबद्दल  शिंदेंनी कोल्हेंचे अभिनंदन करुन विशेष कौतुक केले. विवेक कोल्हेंचा समजुतदार पण भविष्यात लाभदायक असणार आहे.

 थेट अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विवेक कोल्हेंना आशिर्वाद मिळाला. मी आमदारांना शपथी देतो आता तर तुमच्या नगराध्यक्ष, नगरसेवकांना शपथ दिली असल्याने शहर  विकास कामासाठी  विवेक कोल्हेंच्या पाठिशी हा राम शिंदे आहे. कोपरगाव, मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत सत्ता आपली आहे तेव्हा विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही. असे म्हणत कोल्हे परिवारासह नगराध्यक्ष पराग संधान यांचे शिंदेनी भरभरून कौतूक केले.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, आजचा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहीणारा क्षण आहे. प्रथमच अशी एक हाती सत्ता येथे मिळाली आहे. प्रा. राम शिंदे हे जिल्ह्याचे पुर्वी पालकमंञी होते  कसा पालकमंत्री असावा याचा आदर्श म्हणजे राम शिंदे आहेत.  कोणताही दुजाभाव न ठेवता पुर्वी अनेक विकास कामे त्यांनी जिल्ह्यात  केली. आता शिंदे हे पालकमंत्री  नसले तरी आमचे पालकत्व  घ्यावे. यापुढे  जनतेला कृतीतून बोलणार आहोत. कोपरगावकरांना दिलेला शब्द पुर्णत्वास नेण्यासाठी शिंदेंनी  सहकार्य करावे अशी मागणी करीत शहर विकासाचा विश्वास नामा पुर्ण केल्याशिवाय पुढच्या निवडणुकीत आपण जनतेला मत मागणार नाही असे म्हणत अभिवचन विवेक कोल्हेंनी यावेळी उपस्थितांना  दिले.

 या प्रसंगी  बोलताना स्नेहलता कोल्हे  म्हणाल्या की, आजचा सोहळा हा आनंददायी आहे. सर्वांनी एकञ येवून हा सामुहीक विजय मिळवला. राम शिंदे पालकमंत्री असताना मी आमदार होते तेव्हा मतदार संघात विकास कामे करण्यासाठी  त्यांची मोठी मदत मला  मिळाली होती.  त्यामुळे आता तुम्हीच आमच पालकत्व घ्यावे असे म्हणत यापुढे विकास कामे करण्यासाठी मदत करण्याची विनंती शिंदे यांच्याकडे  करुन. कोपरगावच्या जनतेचे विशेष आभार मानले. 

नगराध्यक्ष पराग संधान  म्हणाले की,  प्रथमच  कोपरगावला  नगराध्यक्षासह  व बहुमत असलेली  संधी मिळाली.  त्यामुळे जनतेला दिललेले वचन पुर्ण करण्यासाठी पहील्या  शंभर दिवसात शंभर कामे करण्याचे अभिवचन दिले होते त्याचा शुभारंभ करुन जनतेला दिलेला विश्वास नामा पुर्णत्वास घेवून जात आहोत असे म्हणत भवी कार्याचा लेखाजोखा  मांडला. या ऐतिहासिक सोहळ्याला नागरीकांची प्रचंड गर्दी झाली होती. या  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण ठाकरे यांनी केले तर नगरसेवक जितेंद्र रणशुर यांनी उपस्थितांचे आभार मानले.