श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या साईला १ लाख ७५ हजारांची स्कॉलरशिप

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ :   नाशिक येथिल बी.पी.पाटील जुनियर कॉलेज  यांच्या वतीने  ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा १४ डिसेंबर रोजी विद्यालयात  पार पडली. या परीक्षेत सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमधून विद्यालयाचा साई नारायण कुलकर्णी हा तालुक्यात प्रथम आला असुन त्याला ५१ हजाराची स्कॉलरशिप मिळाली आहे.

त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी बीपी पाटील जुनिअर कॉलेज आयोजित या स्पर्धेत अहिल्यानगर व नाशिक दोन्ही जिल्हातुन एकूण ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये देखिल श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी हा द्वितीय आला असुन त्यामध्ये हि १ लाख २१ हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळवली. 

 पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन्माननीय पत्रकार व संस्थाचालकाच्या वतीने साई कुलकर्णी व त्याचे  वडील नारायण कुळकर्णी  यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करुन गौरव करण्यात आला. या प्रसंगी श्रीमान  गोकुळचंद विद्यालय संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत  ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे,

आनंद  ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, उद्योगपती राजेश ठोळे, संदीप अजमेरे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, ज्येष्ठ कला शिक्षक दिलीप तुपसैंदर मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभिम उल्हारे या सर्वांनी साई कुलकर्णीचे त्याचबरोबर त्याचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर देसाई सर यांनी केले.

 प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने शैक्षणिक वाटचाल करणाऱ्या साई नारायण कुलकर्णी याच्या यशामुळे त्याच्यावर कोपरगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून तसेच जिल्ह्यातील सर्व क्षेञातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचे वडिल नारायण कुलकर्णी व चुलते ज्ञानेश्वर कुलकर्णीसह संपूर्ण कुलकर्णी परिवाराचे कौतूक केले जात आहे.

Leave a Reply