जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजीमध्ये संजीवनीच्या ६९ विद्यार्थ्यांची निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभाग उद्योगांच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना सक्षम करत उत्कृष्ट  कार्य करत आहे. या विभागाने सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नामांकित कंपन्यांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना उज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच  प्रयत्नांतुन या विभागाने जेके मैनी प्रिसिजन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते.

यात कंपनीने बी.टेक अंतिम वर्ष  मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या १७, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या ७, इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या २३ व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या २२ अशा  एकुण ६९ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड पी विभागाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

नोकरीसाठी निवडीत मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या सिद्देश सत्यजीत आवारे, ऋषिकेश अशोक भाले, नरेंद्र बाळासाहेब भारती, आदित्य धनंजय भुजबळ, अमोल सोमनाथ धुमाळ, ओमकार संदीप ढुस, सुजित गहिनीनाथ दिघे, ओमकार पंडीतराव जावळे, जीवन राजु कोळपे, हर्षिता कालीप्रसाद कुऱ्हे , अनिरूध्द अनिलराव लकारे, सुदर्शन  दत्तात्रय निकम, वैष्णवी  वाल्मीक वागडे, विशाल  आसाराम दुधाड, हरेश शाम अव्हाड व साक्षी महेंद्र गोसावी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या विद्या संजय अहिरे, रितेश  महारू चव्हाण, साईश  प्रमोद पाळंदे, साहील लक्ष्मण रेवगडे, रोहन शैलेश  गांगुर्डे, गणेश  वसंत घोरपडे, अभिषेक संतोष  गव्हाणे,

इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या साक्षी महेंद्र बनसोडे, जान्हवी आनंद बारबिंड, योगेश  बाळासाहेब बोंबले, मानिका कचरू देवरे, साईनाथ रामभाऊ धुमसे, सुमेधा संदिप घोडके, पायल विजय कळसकर, मुस्तफा रियाझ कुरेशी, रोहन कैलास कुटे, अविष्कार  मढवई, प्रतिक्षा बाबासाहेब पुणे, प्राची राजेंद्र शिरोळे, ओंकार जनार्दन थोरात, श्रेयश चंद्रशेखर ठुबे, ऋतुजा प्रविण उरूनकर, आयुष संतोष  वालझडे, अनुज देवेंद्र वारूळे, साईश  पाराजी वैद्य, अजय बाळासाहेब पाचोरे, आरती संजय गुंजाळ, तेजस दत्तात्रय कोल्हे, इजय रामा गवळी व अनेरी दत्तात्रय ठाणगे,

मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋषिकेश  रावसाहेब औताडे, प्रणित संतोश  बारहाते, हर्षल  दत्तात्रय दरेकर, उदय रविंद्र देवरे, दर्शन  रंगनाथ ढमाले, निकिता सुरेश  डोंगरे, सोनल आदिनाथ इखे, प्रदिप अनिल जाधव, आकांक्षा गोरक्षनाथ कदम, अर्पिता राजाराम काळे, स्मीता देविदास कसबे, दिक्षा राहुल खळे, श्रुष्टी  जगदिश  खरात, पायल सुरेश  म्हसे, गायत्री विलास नागरे, सार्थक सुधाकर नरोडे, इंद्रायणी सोमनाथ निकम, पुणम सतिश शिंदे , स्वप्नील अशोक  सोनवणे, कृतिका शामकांत सुराडे, दिशा ज्ञानेश्वर गंडे व फायझान फरीद शेख यांचा समावेश  आहे.

  संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांंचा सत्कार केला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. आर.ए. कापगते, डॉ. प्रसाद पटारे, डॉ. डी.बी. परदेषी, डॉ. व्ही. एम तिडके आदी उपस्थित होते.

Leave a Reply