कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : अजितदादा पवार जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरीही त्यांची नाळ सर्वच पक्षांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांशी जुळलेली होती. जनतेच्या मनाशी जोडणारे भाषण करणारा सच्च मनाचा लोकनेता म्हणजे अजितदादा पवार होते.

अजितदादांच्या निधनाची वार्ता ऐकताच मनाला विश्वास पटेना काही क्षणात मोठा भूकंप झाल्यासारखा मनाला धक्का बसला. कालच विवेक कोल्हे यांच्याशी मनमोकळेपणाने आपुलकीच्या नातेत्याने चर्चा केली आणि चोविस तासाच्या आतच त्यांचा अपघाती मृत्यू होणे हि घटनाला राज्याला हादरवून टाकणारी आहे. अशी प्रतिक्रिया भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, अजित पवार यांच्या कामामध्ये जनमासांप्रती ओढ होती. अतिशय स्पष्ट वक्ते होते. वेळेला महत्व देवून शिस्तप्रिय काम करत प्रशासनावर त्यांचा दबदबा होता. मंञी मंडळातील अनेक खात्यांचा त्यांना मोठा अनुभव होता. जनमाणसांच्या मनात स्थान निर्माण करणारा हा लोकनेता गेल्याने राज्याची मोठी हानी झाली आहे.

अजितदादांचे कोल्हे परिवाराचे स्नेहाचे व आपुलकीचे संबंध होते. असा नेता पुन्हा होणे नाही. मी आमदार असताना त्यांच्या कार्याचा मी सभागृहात अनुभव घेतला त्यांचे थेट सभागृहात मी कौतूक केल्याची आठवण सांगत स्नेहलता कोल्हे यांनी स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख अंतःकरणाने शोक व्यक्त करुन श्रद्धांजली व्यक्त केली.


