अजितदादांच्या जे पोटात तेच ओठात होत  – बिपिन कोल्हे

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८: राज्याच्या राजकारणातील स्पष्ट व्यक्तीमत्व व दिलखुलास असलेला नेता म्हणजे अजितदादा पवार होते. त्यांच्या जे  पोटात तेच ओठात होते. पक्ष वेगळा असला तरीही आमची आपुलकी वेगळीच होती. अशा अनुभवी नेत्याचे अकस्मात निधन होणे अतिशय दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारे आहे पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच डसा डसा रडू आले. अशी भावनीक प्रतिक्रिया संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिले.

ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासुन ते मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयाचे बांधकाम करे पर्यंत आम्ही अनेक वर्ष जवळून काम केलो. अजित पवार यांना सर्वप्रथम उपमुख्यमंत्री करण्यासाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी  सहमती  दिली होती. राज्याच्या राजकारणातील अतिशय अनुभवी  व मोठ्या मनाचा नेता महाराष्ट्राने गमवला आहे. खिलाडी वृत्तीने राजकारण करणारा व जनमाणसांच्या विकास कामांना तळमळीने महत्त्व देणारा नेता होता.

जे चुकलं ते चुकलं म्हणून स्वत:ची मोठ्या मनाने कबुल करुन पुढे चालणे हा त्यांचा चांगला गुण होता असे म्हणत कोल्हे यांनी स्व. अजित पवार यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्याने पवार यांना शब्दरुपाने श्रद्धांजली व्यक्त करीत स्व विलासराव देशमुख नंतर अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय असेही  म्हणत शोक व्यक्त केला.

Leave a Reply