शेवगाव प्रतिनिधी, दि.६ : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर काही दिवसांपूर्वी मंदिरा समोरील दानपेटी चोरीला गेली. एक महिना उलटून ही चोरीचा अद्याप तपास लागला नाही. बीड पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे मिळत आह
त्यातील काही संशयीत आरोपींनी गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांना गडावर जाऊन शिवीगाळ व दम दाटी करण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी व निंदनीय प्रकारामुळे गडाच्या लाखो अनुयायाच्या भावनेला धक्का पोहचला आहे. त्याचा निषेध म्हणून शेवगाव तालुका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व गडाचे भावीक यांनी शेवगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन देऊन या घटनेचा तपास करावा, दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी आखेगावच्या श्री जोग महाराज संस्कार केंद्राचे ह. भ. प. राम महाराज झिंजूर्के, जगदीश धूत, मनोज कांबळे, केशव भुजबळ, बंडू रासने, डॉ. निरज लांडे, भाजपा युवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उमेश भालसिंग, गंगा खेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, नवनाथ कवडे, लक्ष्मण पालवे, दिलीप सुपारे, प्रकाश पालवे, रविंद्र उगलमुगले आदी मान्यवर उपस्थित होते.