कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विदयार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाची पीएच.डी. (विदयावाचस्पती) ही उच्च पदवी नुकतीच जाहीर झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
प्रा. रवींद्र ठाकरे यांचा पी.एच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या वतीने विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, चासनळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. जी. बारे, हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रो. डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे व प्रा. सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “डॉ. रवींद्र ठाकरे यांनी ‘बृजेश सिंह की गजलों में पर्यावरण चेतना’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाला आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना (डॉ.) अनिता नेरे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. रवींद्र ठाकरे हे के.जे. सोमैया महाविदयालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे पीएच.डी. पदवी प्राप्त करणारे दुसरे संशोधक विद्यार्थी आहेत.
डॉ. रवींद्र ठाकरे यांनी संशोधनाबरोबरच आपले अनेक शोधनिबंध विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. ते गेल्या १७ वर्षांपासून महात्मा गांधी विदयामंदिर, नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविदयालयात येवला येथे हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.”
डॉ. ठाकरे यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अॅड् संजीव कुलकर्णी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.