शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगाव तालुक्यातील शेकटे येथील बलात्कार व अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कलमान्वये शेवगाव पोलिस ठाण्यात गेल्या ७ मार्चला दाखल झालेल्या गुन्हयातील आरोपी विक्रम जनार्धन चव्हाण हा फरार होता. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांनी विशेष लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवली
आणि आरोपी चतुर्भूज केला.
पाटील यांनी तयार केलेल्या पथकास आरोपी चव्हाण भिमा कोरेगाव पुणे येथे असल्याचे समजले. मात्र आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळून जात असतांना शेवगाव पोलीस पथकाने त्याला पिंपळे जगताप चौफुला भिमा कोरेगाव, पुणे येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे.
सदरची कारवाई सहायक फौजदार विष्णु घोडेचौर, पोहेकॉ परशुराम नाकाडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ बाप्पासाहेव धाकतोडे, पोकॉ संतोष वाघ, पोकों संपत खेडकर, पोकाँ एकनाथ गरकळ, पोकाँ राहुल तिकोणे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी पार पाडली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील हे करत आहेत.

