शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांचे शेवगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : शेवगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकरी, शिक्षक, महीला भगीणी, व्यापारी, व्यवसायीकांची शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना  MPID  अंतर्गत कायदेशीर कारवाई करून त्वरित अटक करण्यात यावी, ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या तक्रारीनुसार तात्काळ  गुन्हे दाखल करून फसवणूक झालेल्या कुटुंबांतील व्यक्तींना न्याय द्यावा या मागण्यांसाठी गुरुवारी (दि ८ ) वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा शिवाजी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पोलीस स्टेशवर गेल्यानंतर फसवणूक झालेले शेतकरी वयोवृद्ध महिला आणि मोर्चेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांची आणि पळून गेलेले शेअर मार्केटिंगवाले यांची मिलिभगत असून त्यांचे पोलीस निरीक्षकासह काही पोलिसांशी हितसंबंध असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

मार्केटिंगवाले राजरोसपने पोलीस स्टेशनला येतात, तक्रार आली की, पोलिसच त्यांना ताबडतोब माहिती देतात त्यामुळेच ते तक्रारदारांना धमक्या देतात असे गंभीर आरोप मोर्चेकऱ्यांनी केले. आर्थिक फसवणुकीच्या या घटनेमुळे अनेकांचे संसार अडचणीत सापडले आहेत तसेच बाजारपेठेची उलाढाल ही कमालीची मंदावली आहे हे सांगताना अनेकांना अश्रू अनावर झाले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. चव्हाण यांनी बोलतांना पोलीस खात्याचे वाभाडेच काढले. या फसवणूकमध्ये पोलिसांचे हात बरबाटलेले असून फसवणूक करणाऱ्यांची तक्रार पोलिसांकडे करणे म्हणजे चोरांची तक्रार महाचोरांकडे करण्यासारखे आहे, येथे तक्रारी घेतल्या जात नाही उलट तक्रार देणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजाऱ्यात उभे केले जाते. पोलिसांची आणि शेअर मार्केटिंग वाल्यांची दिवसा ढवळ्या मिलिभगत झाली असून येथील पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच अनेकांची कोट्यावाधीची फसवणूक झाली.

त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, त्यांनी ज्यांच्या नावावर मालमत्ता केली आहे त्यांनाही आरोपी करा, पळून जाण्यास मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा यापद्धतीने पोलिसांनी कारवाई करावी यासाठी पुन्हा सोमवारी (दि १९ )  रोजी फसवणूक झालेले हजारो लोक मोर्चाने येऊन बेमुदत उपोषणास बसतील असा इशाराही प्रा. चव्हाण यांनी दिला. 

शेवगाव तालुक्यातील किमान पंधरा हजार कुटुंबाची कोट्यावधी रुपयांची शेअर मार्केटिंग वाल्यांनी फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आहे. तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल शेख, गहिनीनाथ कातकडे रामेश्वर शेळके, आत्माराम निजवे, ज्ञानदेव कातकडे, मनोज कातकडे, सुभाष आंधळे, जालिंदर घावटे, दत्तात्रय औटी, कैलास राऊत, गणेश काळे, लक्षमन विघ्ने, कडुबाळ सातपुते, बाळासाहेब कातकडे, युवा तालुका अध्यक्ष सागर गरूड, रवींद्र निळ, लक्ष्मण मोरे, राजू मेहेर, मारुती लांडे, एकनाथ क्षिरसागर, वसंत औटी, महादेव शिंदे शामराव जगदाळे, रोहीदास कंठाळे, मच्छिंद्र कोरडे, राहुल चौगुले, शेख इसाक कासम, विनोद घाडगे, संदीप घाडगे अंबिका धोत्रे संदिप रुईकर, प्रमिला ओव्होळ, मनोज जाधव, साईनाथ भागवत, कल्याण भागवत, गोरख वाघमारे, चंदन थोरात, रवी जगधणे, नारायण सातपुते, बाप्पासाहेब उल्हारे व अनेक फसवणूक झालेल्या महीला भगीणी मोठ्या संख्येने  कागदपत्राच्या पुराव्यासह उपस्थित होत्या.