शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, शैक्षणिक स्पर्धेत ग्रामीण परिसरातील विद्यार्थी अग्रेसर ठरावेत. म्हणून लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांनी जनता शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून विविध माध्यमिक विद्यालये उभी केली. या संस्थेचे असंख्य विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या कोणत्याही क्षेत्रात जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत असे अवाहन
माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले यांनी केले.
लोकनेते स्व .मारूतराव घुले पाटील यांच्या स्मृती निमित्ताने पार पडलेल्या तालुकास्तरीय वकृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा सन्मान सोहळा रविवारी येथील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून माजी आमदार डॉ. घुले बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, शालेय विद्यार्थ्यानी शिक्षणा बरोबरच विविध स्पर्धेत सहभागी होत जावे. तसेच आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवावे ‘तालुक्यातील युवकांसाठी येथे मिनी एमआयडीसी उभारणे गरजे आहे. शालेय स्पर्धेत आपण यशश्वी झाला आहात लवकरच आमच्याही होत असलेल्या राजकीय स्पर्धेत आपले सहकार्य हवे असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रास्ताविकात म्हणाले, तालुक्यातील प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील १५ हजार विद्यार्थी विद्यार्थिनी विविध स्पर्धेत सहभागी झाल्याचे नमूद करून या निमित्ताने गुणवंताचा गौरव होत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संजय फडके, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, नाना पाटील मडके, हनुमान पातकळ, संतोष पावसे, मंगेश थोरात, मिलिंद नाना कुलकर्णी, नानासाहेब औटी, भाऊराव भोंगळे, भारूडकार हमीद सय्यद, यांचेसह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मच्छिंद्र पानकर यांनी सुत्रसंचलन केले तर ताहेर पटेल यांनी आभार मानले.