शासनाविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : भारतीय कम्युनिस्ट पक्ष,आयटक आशा व गटप्रवर्तक कर्नचारी संघटना व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ शेवगांव तालुका यांच्या संयुक्त वतीने आज शुक्रवारी शासनाविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

    यावेळी  “जात निहाय जनगणना करा, आरक्षणाची 50% मर्यादा उठवा, सर्व कामगारांना सहव्वीसवीस हजार रुपये किमान वेतन करा, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना किमान वेतन, शासकीय कर्मचा-याचा दर्जा व निवृत्ती नंतर पेन्शन द्या, कष्टकरी वर्गाला साठ वर्षांनंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या , कामगार भरती करा, बेरोजगारी संपवा, महागाई कमी करा, कंत्राटी करून खाजगीकरण थांबवा.

स्मार्ट मीटर मागे घ्या, महिला मुली यांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदारांवर कारवाई करा, मागेल त्याला रेशन द्या, शिक्षणाचा बाजार थांबवा, शेतीमालाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, भ्रष्टाचार थांबवा, यासोबतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एकोणीस महिन्यांची वेतन यावलकर समिती व थकित वेतन द्या या मागण्याचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आले.

    मोर्च्यात कॉ. संजय नांगरे, गोरक्षनाथ काकडे, राम लांडे, शमा सयद, संतोष लहासे, बापुसाहेब तुतारे, शेख अब्दुल, सयद बाबुलाल, आंधळे आदिनाथ, सुलभ महाजन, रंजना परदेशी, पोर्णिमा इंगळे, वैशाली देशमुख, संगिता रायकर, वर्षा निजवे, स्वाती गाढेकर, क्रांती थोरात, कावेरी खंडागळे, मंदा नागरे, तारा आव्हाड, लता आव्हाड, नामदेव सानप, संजय तेलोरे, ज्योती नागरे, उषा थोरात, सविता हजारे, मनिषा दिवटे सह मोठया संख्योने कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.