शेवगावकरांना लवकरच दररोज पाणी दिल्याचे समाधान – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : शेवगावकरांना लवकरच दररोज पाणी दिल्याचे समाधान मला लाभणार आहे. या योजनेची संकल्पना २०१७ मध्ये राजीव राजळे यांनी मांडली होती ती पुर्णत्वास आली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका ताई  राजळे यांनी केले. शेवगाव शहरासाठी ७२ कोटी ५० लक्ष खर्चाची पाणी पुरवठा योजना व ४ कोटी ४२ लक्ष खर्चाच्या २५ विविध विकास कामांचा शुभारंभ आज शुक्रवारी आमदार राजळे यांच्या हस्ते झाला .त्या वेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बापुसाहेब भोसले, भिमराज सागडे, ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, गणेश कोरडे, शहराध्यक्ष बापु धनवडे, शिवसेनेचे आशुतोष डहाळे, साईनाथ आधाट, वाय.डी.कोल्हे, राजभाऊ लड्डा, रविंद्र सुरवसे, गणेश रांधवणे, कमलताई खेडकर, आशाताई गरड, तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्यासह शहरातील महिला व नागरीक उपस्थित होते.

आ. राजळे म्हणाल्या, येथील पाणी पुरवठा योजनेनंतर आता शहरातील २०० कोटींचा भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. तिसगाव ते पैठण या चारपदरी सिमेंट काँक्रेट रस्त्याचे कामही सुरू होत आहे. ही योजना करताना शेवगावकरांना कोणी नारळ फोडले याचा संभ्रम राहिलेला नाही. मात्र २०१४ पासुन जो नारळ फोडला त्याचे काम झालेले दिसणार आहे. गेल्या ७ वर्षापासून या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा पाठपुरावा केला. २०१७ मध्ये राजीव राजळे यांनी योजनेची संकल्पना माडंली. २०१८ मध्ये यास तांत्रीक मान्यता मिळाली त्यावेळी याची किंमत ५६ कोटी २७ लक्ष होती.

त्यानंतर २०१९ – २० मध्ये शासनाची दरसुची बदलली व ९ जुलै २०१९ रोजी नविन दर सुचिनुसार सुधारीत तांत्रीक मान्यता मिळाली. बदललेले सरकार तसेच नगरपरिषदेची फसवणुक करणारा ठेकेदार यामुळे अडथळ्याची शर्यत पार पाडत असताना नव्याने टेंडर प्रक्रिया करून आता प्रत्यक्षात या योजनेच्या कामास सुरवात होणार आहे. सत्ता आज आहे उद्या नाही मात्र चांगले काम केल्याचे समाधान यामुळे मिळणार आहे.

मात्र निवडणुका आल्यावर कामाचा श्रेयवाद ऊफाळून येतो.  ज्याच्या अधिकारात जे काम आहे, ज्याची जी पात्रता आहे त्यांनी ते काम केले पाहिजे. परंतु ज्याचा नगरपरिषदेशी काडीचा संबंध नाही व योजनेच्या पाठपुराव्याची काहीही माहिती नाही, अशांनी कामाचे श्रेय घेऊ नये असा सल्ला आ. राजळे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

      विकास कामे करताना अनेक आरोप प्रत्यारोप झाले त्यास उत्तर न देता आपण काम करीत राहीलो. जनतेने मला काम करण्यासाठी निवडून दिले. शासन आणी तुमच्यातील मी दुवा आहे २०१४ पासुन तुम्ही मला आशीर्वाद दिला असाच भविष्यात सुद्धा सर्वांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन आ.राजळे यांनी यावेळी केले.

       प्र . मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर माहिती दिली आगामी २५ ते ३० वर्षाचे नियोजन गृहीत धरून पुढील २०५१ साली  शहराची सुमारे  लोकसंख्या ९० हजार गृहीत धरून पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आल्याचे ते म्हणाले योजनेचे ठेकेदार स्वस्तिक कंट्रक्शन कोल्हापूर चे प्रतिनिधी श्रीधर म्हस्के यांना योजनेचा कार्यारंभ आदेश तहसीलदार प्रशांत सांगडे व मुख्याधिकारी  लांडगे यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केले, राजू सुरवसे यांनी सुत्रसंचलन केले तर माजी. नगरसेवक सागर फडके यांनी आभार मानले. 

Leave a Reply