कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. प्रारंभी उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी सुरक्षा अधिकारी रमेश डांगे व सर्व सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांनी बँड पथकाच्या तालावर बहारदार ध्वज संचलन केले. याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संचालक विश्वास महाले, त्रिंबक सरोदे, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, ज्ञानेश्वर होन, अप्पासाहेब दवंगे, संजय औताडे,
सर्व आजी-माजी संचालक, प्रदीप नवले, फकीरराव बोरणारे, डॉ. गुलाबराव वरकड, जयराम गडाख, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम, कैलास खैरे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत सादर केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना इमारतीवर तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती., हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा ध्वज डौलाने फडकत होते.