राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंद साजरा

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत व्यापारी संकुलाला मंजुरी देण्यात येवून या व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.

Mypage

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतांना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून विकासाचे अनेक मुलभूत प्रश्न सोडविले आहेत. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व कोपरगाव शहराचा देखील जास्तीत जास्त विकास व्हावा. यासाठी त्यांनी बस आगाराच्या लगत व्यापारी संकुल मंजूर करून आणले आहे. 

Mypage

नुकतीच कोपरगाव बस आगार पुनर्बांधणी व व्यापारी संकुल इमारत बांधकाम करण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे निश्चितपणे कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळणार असल्यामुळे कोपरगावकरांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला आहे. हा आनंद राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण कोपरगाव शहरात नागरिकांना पेढे वाटून साजरा केला.

Mypage

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस फिरोज पठाण, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजीमेहमूद सय्यद, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, राजेंद्र खैरनार,

Mypage

वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, धनंजय कहार, आकाश डागा, चांदभाई पठाण, नितिनि शिंदे, ऋषीकेश खैरनार, निलेश डांगे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, कैलास मंजुळ, रोशन शेजवळ, महेश उदावंत, फिरोज पठाण, तेजस साबळे, विजय नागरे, अमोल गिरमे, अमोल देवकर, युसूफ शेख, जावेद शेख, ऋतुराज काळे,अनिरुद्ध काळे आदींसह कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

Mypage