सीएच्या परिक्षेत हातगावचे भूमिपुत्र हर्ष लखोटीयाचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : तालुक्यातील हातगाव येथील भूमिपुत्र हर्ष सतिष लखोटिया सी ए विशेष गुणवत्ते सह ऊत्तीर्ण झाला आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून शनिवारी (दि.१३) हातगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भूमिपुत्र हर्ष लखोटिया यांचा सन्मान करण्यात आला.

यापूर्वी हर्षने सीए फाउंडेशन परीक्षेत देशात ३७ वा व इंटरमीडियेट मध्ये ५४२ गुण घेऊन जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाकडून घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत हर्ष जिल्हयात दुसरा आला आहे. या परीक्षेत लखोटीयाने ४७८ गुण घेऊन पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

कुटुंब व मिंत्राच्या पाठबळाने हे यश मी मिळवले. त्यात अकॅडमी व शैक्षणिक संस्थांचा चाळीस टक्के तर कुटुंब, मित्रपरिवार यांच्या पाठबळाचे साठ टक्के मिळाल्याने मी सीए सारखी कठीण परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास करू शकलो. आता यु.पी.एस.सी. परीक्षेची तयारी करणार असून तिही जिद्दीने पास होण्याची उमेद बाळगून आहे. हर्ष लखोटिया, हातगाव. 

शहरातील आर्य चाणक्य विद्या मंदिर येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, पुणे येथील बीएमसीसी कॉलेज मध्ये बारावीचे शिक्षण घेतले,  पुणे येथील एकत्वम अकॅडमी व व्ही स्मार्ट अकॅडमी येथे सीए अभ्यासक्रमाची तयारी केली. हर्षच्या यशाबद्दल बोलताना त्याचे वडील सतीष लखोटीया यांनी आजोबा बद्रीनारायन लखोटीया यांचे आशिर्वाद व त्याची मेहनत या यशाच्या कामी आल्याची भावना यावेळी व्यक्त केली. 

त्याच्या यशाबद्दल हातगावचे सरपंच अरुण मातंग, बद्री बर्गे, समीर शेख, भाऊ मासाळ, कवडे मामा, गणपत अभंग, हौसाराम अकोलकर, पांडुरंग डांगे, दत्ता गायकवाड, सुभाष लखोटिया, अमोल लखोटीया, नंदकिशोर लाखोटिया, शाम बूटे आदींनी यावेळी त्याचे अभिनंदन केले.