शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : येथील आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे दि.१० ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पहिल्या दिवशी हस्तकला, चित्रकला, रांगोळी, मेहंदी प्रदर्शन तसेच विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोहटादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता पाटील, सरीता पुरनाळे, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, श्रीमती मंदाकिनी पुरनाळे यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक केले.
विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, लावणी नृत्ये, कोळी गीते, एकांकीका, समाज प्रबोधनपर नाटिका, शेतकरी गीते, गायन, वादन अशा तब्बल १२० कार्यक्रमांची रेलचेल होती. जि.प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षते खाली पारितोषिक वितरतरण झाले. या वेळी प्रसिद्ध भारुडकार गोविंद महाराज गायकवाड, प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्राचार्य संपत दसपुते, प्रभारी उपप्राचार्य अशोक तमनर, उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड, प्रा. अशोक आहेर, विद्यार्थी प्रतिनिधी सोहम काळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी पल्लवी पायघन उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा, वकृत्व, चित्रकला, मेहंदी, हस्तकला, विज्ञान व गणित प्रदर्शन, विज्ञान स्पर्धा परीक्षा अशा विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व शालेयस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग यांनी यावेळी विद्यालयास एक लाख रुपये किमतीचे डिजिटल क्लासरूम साहित्य भेट दिले. कॅनडा बँक शाखेच्या वतीने बँक मॅनेजर सतीश इरोळे व असिस्टंट बँक मॅनेजर राहुल गुप्ता यांच्या वतीने विद्यार्थ्यांना कॅनरा विद्यालक्ष्मी स्कॉलरशिपचे वाटप करण्यात आले. प्राचार्य संपत दसपुते यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर गरड व प्रा.जरीना शेख यांनी सुत्रसंचलन केले.