३० वर्षापासून त्यांना शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावता आला नाही – मोनिका राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : तिस ते पस्तीस वर्षापासून तालुक्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते. त्यांना त्यांच्या कार्यकाळात शहराचा साधा पाणी प्रश्न सोडवता आला नाही, ते आज विकास झाला नसल्याचे सांगत आहेत. माझ्या माता भगिनिंची पाण्या वाचून होणारी पायपीट, होणारे प्रचंड हाल, मला पहावले नाहीत. एक महिलेचे दुःख दुसरी महिलाच समजू शकते. शहरातील महिलांच्या भावना लक्षात घेऊन प्राधान्याने पाणी प्रश्न सोडविला. शेवगाव शहर पाणी योजनेच्या पाईपलाईंनचे, टाकीचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. काही महिन्यात शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी चार वाजता शहरातून प्रचंड  रॅली काढून राजळे यांनी प्रचाराची सांगता केली. रॅलीच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय होती.

आमदार राजळे पुढे म्हणाल्या, तालुक्याची सत्ता, नेतृत्व त्यांच्याकडे होते. मात्र त्यांनी पाणी प्रश्न मार्गी लावला नाही. जे दहा वर्षात मतदार संघात फिरले नाहीत त्यांना विकास कसा दिसेल असे सांगत, राजळे यांनी नामोल्लेख न करता आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा झाला. अनेकांची मोठी फसवणूक झाली. त्यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तत्काळ गुन्हे दाखल करण्या बाबत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले.

तालुक्यातील फसवणूक झालेल्या लोकांच्या भावना समजून घेत विधानसभेत अधिवेशना वेळी आवाज उठवला, आज समोरील पाथर्डीचे उमेदवार सांगत आहेत की, फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळवून देऊ, मात्र त्यांचे ते स्वप्न स्वप्नच राहणार आहे. असे म्हणत राजळे यांनी ॲड. प्रताप ढाकणे यांच्यावर संधान साधले.

शेवगाव पाथर्डी असा भेदभाव न करता दोन्ही तालुक्यावर समान प्रेम केले. आईला आपली मूल सारखीच असतात, त्याच भूमिकेतून मी विकास कामे केल्याचे सांगून शेवगाव तालुका मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाची भूमिका पार पाडावी.

२०१४ व २०१९ ला हे सर्व  विरोधक म्हणून एकत्र होते. यांनी मला महिला म्हणून घेरण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या सारख्या भावांनी मला साथ दिली. शहराचे सौंदरीकरण, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, प्रशासकीय इमारती, ओपन थेटर, ज्येष्ठांसाठी उद्यान, मुलांना खेळण्यासाठी बगीचा, आदी योजना भविष्यात आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आपण सर्वजण उमेदवार आहोत या भावनेतून काम करायचे आहे. विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करुन आशीर्वाद द्यायचे, जातीपातीच्या मुद्याला  थारा न देता, दबावाला बळी न पडता स्वच्छ व मनमोकळ्या वातावरणात जास्तीत जास्त मतदान घडवून आणावे व कमळाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 

Leave a Reply