क्रिकेटपटू झहीर खान साईचरणी लीन

 शिडी प्रतिनिधी, दि. २६ : प्रसिद्ध क्रिकेट पट्टु आणि मुळचा शिर्डी जवळील श्रीरामपूर येथील रहिवासी असलेल्या झहीर खानने गुरुवारी पत्नी सागरिकासह शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतल.

नुकतच सचिनने एका मुलांचा गेंदबाजी करतांनाच्या व्हिडिओ ट्वीट करतांना तीची झहीरशी तुलना केली होती. त्यावर बोलतांना झहीरने त्या मुलीची बॉलिंग अँक्शन माझ्या सारखीच आहे. ही चांगली बाब आहे की तीच टँलेट चांगल आहे व आपल्या देशात टॅलेंट ला प्रोत्साहन मिळत. मेहनत करुन पुढे जाता येत. भारतात क्रिकेटसाठी चांगल वातावरणा आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहारात लहानसा मोठा झालेला झहीरने नंतर क्रिकेट विश्वात आपल नाव कमवल लहान पणापासूनच त्याचे वडील त्याला साई दर्शनासाठी घेवुन येत असे गुरुवारी अनेक दिवसानंतर झहीरने आपली पत्नी सागरीका हिच्या समवेत शिर्डीला येत साई समाधीचे दर्शन घेतलय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी साईबाबा संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.

साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना मी इथलाच भुमी पुत्र आहेत. या भुमिच्या जुण्या आठवणी मनात आहेत आज बर्याच दिवसानी शिर्डीला येण झाल सर्वांच्या कल्यानासाठी साईकडे प्रार्थना केल्याच सांगत. राजस्थानच्या मुलीचा बॉलिंग करतांनाचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावर बोलतांना त्या मुलीच कैतुक करत तीच्या टँलेट आहे. तीने चांगली मेहनत केली तर ती नक्कीच नाव कमवले अस म्हटलय. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची भेट झाली का यावर बोलण्यास जहीरने टाळले.