शेवगावमध्ये सिंगल युज प्लास्टिक, कागदी कप वापरण्यावर बंदी 

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ :   शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगरपरिषदेच्या हद्दीत सिंगल युज प्लास्टिक आणि चहा कॉफी वा थंड पेयासाठी वापरण्यात येणारे कागदी कप वापरण्यावर बंदी घातली आहे.

या संदर्भात त्यांनी एक सविस्तर परिपत्रक जारी केले असून शहरातील मोक्याच्या जागी नागरिकांनी चहा, कॉफी व थंड पेय घेतांना कागदी कप तसेच पालेभाज्या व किराणा वा अन्य साहित्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरू नयेत यासाठी उद्बोधन   केले असून अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

कोरोना काळा पासून मोठ्या प्रमाणात उपयोगात येत असलेले चहाच्या ठेल्यावरील कागदी कप जीवघेणे ठरत आहेत. प्लास्टिकचे मायक्रो कण असलेल्या सिंगल युज कागदी कपात अति गरम अथवा अति थंड पेय टाकल्यास त्यातील प्लास्टिकचे कन पेया सोबत आपल्या पोटात आणि नंतर ते थेट मेंदुत व रक्तात मिसळत असल्याने कर्करोग, ब्रेन ट्युमर असे गंभीर आजार होत असल्याचे विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनास आले असल्याने राज्यातील विविध शहरात त्याच्या वापरावर  उत्पादनावर आणि वितरणावर शासनाने बंदी घातली असल्याचे नमुद केले आहे.

शेवगाव नगर परिषदेने शहरातील नागरिकांना, व्यावसायिक व्यापारी संघटना, किराणा दुकान विक्रेते, हॉटेल, चहा कॉफिचे दुकानदार टपरीधारक विक्रेते यांना कागदी कप वापरू नयेत अशी नोटीस बजावली आहे. चहा, कॉफीचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. ( बीस्फेनॉल  Bisphenol A) नामक अत्यंत घातक केमिकलचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात.

सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लॉस्टिक कण पेयात वितळतात आणि ते घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे असंख्य नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा कागदी कपांच्या उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूकीस दि. १३ / ०२ / २०२५ रोजी पासून बंदी घालण्यात आली आहे. या नियम व अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे. यातील तरतुदींचे उल्लघंन केल्यास नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

 

Leave a Reply