कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : स्वत:च्या परिस्थितीवर मात करुन हजारो लोकांना रोजगार देत अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या तसेच व्याधीने व्याकुळ झालेल्या हजारो रुग्णांना आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून नवजीवन देणाऱ्या सीमा महेश भोर यांची रियांश मल्टिट्रेड कंपनीच्या वतीने सहा दिवसीय दुबई टूर साठी निवड करण्यात आली आहे.

कोपरगाव येथील शिवदर्शन एन्टरप्रायजेस अँड स्टील सेंटरच्या संचालीका सीमा महेश भोर ह्या गेल्या दोन वर्षांपासून रियांश मल्टिट्रेड कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे सर्वेसर्वा व्यवस्थापकीय संचालक मधुकर जाधव, लक्ष्मण तौर यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा भोर व त्यांचे पती महेश भोर यांनी प्रामाणिकपणे काम करुन कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करीत लाखो रुपयांची कमाई केली.

मनात माणुसभाव असल्याने केवळ स्वतः पुरता विचार न करताता त्यांनी दोन वर्षांत ५ हजारांपेक्षा अधिक गरजू लोकांना रियांश कंपनीचे फुड सप्लिमेंट आयुर्वेदिक प्रोडक्ट, रियांश ज्यूस देवून व्याधीने व्याकुळ झालेल्यांच्या जीवनाला नवसंजीवनी दिली तसेच त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना लाखो रूपये कमावण्याची संधी दिली. त्यामुळे सीमा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात ५० पेक्षा अधिक लोक काम करीत आहेत.

सीमा भोर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून रियांश मल्टिट्रेड कंपनीने त्यांची सहा दिवशीय दुबई टूरसाठी निवड केली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पुण्यातील. संतोष गोगावले व देवेंद्र ढवळे यांचीही सीमा भोर यांच्या सहकार्यामुळे दुबई टूरसाठी निवड करण्यात आली आहे. अवघ्या कमी काळात सातासमुद्रापार भरारी घेण्याचे अतुलनीय कार्य करुन सीमा भोर व महेश भोर ह्या दांपत्याने करुन इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. सीमा भोर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान रियांश अमृत ज्युस हे औषध अनेकांना वरदान ठरल्यामुळे सीमा भोर यांनी राज्यातल्या अनेक रुग्णांना योग्य मार्गदर्शन करीत आपल्या कार्याची व्याप्ती राज्यभर पसरवली आहे. आज हजारो लोकांच्या हाताला काम देवून बेरोजगारांना रोजगार देत असल्याने त्यांचा संपर्क व कामाचा आवाका सर्वञ वाढत आहे. एक सामान्य महिला कमी वेळेत किती असामान्य कार्य करु शकते हे भोर दांपत्याने आपल्या कृतीतून दाखवले आहे. त्यांच्या कार्याचे सर्वञ कौतुक होत आहे.


