काळे गटाच्या राजकारणाला कंटाळून धोत्रे ग्रामपंचायत सदस्य कोल्हे गटात दाखल 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : काळे गटाच्या पातळीहीन राजकारणाला कंटाळून त्यांना सोडचिठ्ठी देत धोत्रे ग्रामपंचायत सदस्य आजमभाई शेख यांनी कोल्हे गटात प्रवेश केल्याने काळे गटाला जबर धक्का बसला आहे. कोल्हे गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांबाबत काळे गटाचे गलिच्छ राजकारण सुरू असल्याने विकासात अडथळे येऊ नये यासाठी कोल्हे गटाचा झेंडा शेख यांनी हाती घेतला आहे. विद्यमान सदस्यच काळे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याने या प्रवेशामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील विकासाच्या बाबतीत झंजावाती काम सुरू असलेले धोत्रे गाव आहे. मा.आ.स्नेहलतातताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या माध्यमातून सर्व सदस्य गावामध्ये विधायक विकास कामे वेगाने करत आहे. या विकास कामांचा धसका घेत काळे गटाने कोल्हे यांच्या काही ग्रामपंचायत सदस्यांना खोडसाळपणे दिलेल्या त्रासामुळे काळे गटाचे सदस्यच नाराज होत त्यांना ही भूमिका मान्य नसल्याचे सांगत होते.

गावात विकास कामे सुरू असताना अशाप्रकारे विनाकारण गलिच्छ राजकारण गाव पातळीवरील नेते करत आहे. आ.आशुतोष काळे यांनी अशा चुकीच्या गोष्टींना पाठबळ देणे हा दुर्दैवी प्रकार आहे. या कुटील राजकारणाचा भाग आम्ही होऊ इच्छित नाही म्हणून कोल्हे गटात प्रवेश करत असल्याची भूमिका अजमभाई शेख यांनी घेतली आहे.

संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते कोल्हे गटात शेख यांनी प्रवेश केला आहे. युवा नेते विवेक कोल्हे यांचीही भेट घेऊन गाव पातळीवरील विकास कामात आम्ही सर्व मिळून जोमाने काम करू असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. 

या प्रसंगी कोल्हे कारखाना संचालक बाळासाहेब वक्ते, धोत्रे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण, उपसरपंच भाऊसाहेब गागरे, माजी उपसरपंच भगवानराव चव्हाण, किरण चव्हाण विजय जामदार, सुरेश जाधव, जयवंत शिंदे, शेषराव शिंदे,सागर शिंदे, शाहरुख सय्यद आदींसह मान्यवर उपस्थित होते.

नुकतेच काळे गटाच्या एका महिला ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा देऊन अद्याप आठ दिवस देखील झाले नसताना दुसरा धक्का कोल्हे गटाने काळे यांना दिला असल्याने जनता चुकीच्या प्रवृत्तींना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply