बेकायदेशीर फ्लेक्स हटवण्यासाठी संजय काळेंचा सत्याग्रह

कोपरगाव पालीकाची फ्लेक्स उतरवण्यासाठी धावपळ सुरु

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव शहरातील चौका चौकात आणि बहुतांश रस्त्यावर मोठमोठे फ्लेक्स बोर्ड लावल्यामुळे शहराचे महा मानवांचे स्मारक झाकले जात आहेत.  उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन पालीक प्रशासन करीत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या दालनासमोर काळा झेंडा हातात घेवून सत्याग्रह केले.

  संजय काळे यांनी सोमवारी सकाळी ९.४५ वाजता कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांचे दालना समोर हातात काळा झेंडा घेऊन उभे राहील्याने पालीका प्रशासनासह नागरीकांमध्ये चर्चेचा विषय झाला. त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन दर महिन्याला नगरपरिषदेला लेखी पत्र देऊन फ्लेक्स वर कारवाई करा असे कळवतात, पण कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावर, शासकीय इमारतीवर, फुटपाथ वर, रस्ता दुभाजकावर, स्ट्रीट लाईटवर, मुख्य चौकात, पार्किंग लॉट मध्ये शुभेच्छा फलक, वाढदिवस, जयंतीचे स्टेज लावले जातात. मुख्यरस्त्यावर बाजार भरवून बाजारपेठेतील रहदारीला अडथळा निर्माण केला जातो. 

दहिहंडी, सार्वजनिक सभा, राजकीय सभांच्यावेळी रहदारीचे रस्ते बंद करुन रस्त्यावर स्टेज घालून बाजारपेठेला बाधा आणली जाते. मुळातच कोपरगाव शहराची  बाजारपेठ अवघी दड किलोमीटरची त्यात वारंवार होणारा रस्ता बंदचा अत्याचार जनतेने का सहन करावा वाळू, घुटका, रेशन, तस्कर बेकायदेशीर सावकार, दारू कारखानदार, भ्रष्टाचारी, शेतकऱ्यांवर दरोडा घालणारे, यांचे मोठे मोठे फ्लेक्स नगरपरिषद प्रशासनाच्या आशीर्वादाने जनतेला  रोज  पहावे लागते. शहरातील बेकायदा फ्लेक्स त्वरीत काढावे यासाठी आपण आज सत्याग्रह करीत आहोत. 

 सकाळी ९.४५ पासून मुख्याधिकारी यांचे दालना समोर बसून दुपारी दिड वाजे पर्यंत उभा होतो. मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आपण कायदेशीर व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन शहरात फ्लेक्स लावत असल्याचे तोंडी सांगिले. माञ त्यांनी लेखी अश्वासन पत्र देण्यासाठी असमर्थता दाखवली. त्यामुळे जोपर्यंत मला लेखी अश्वासन मिळत नाही तो पर्यंत मी रोज सकाळी मुख्याधिकारी कोपरगाव नगरपरिषद यांचे दालना समोर काळा झेंडा घेऊन सकाळी ९.४५ ला येवून मी सत्याग्रह करणार असल्याचे संजय  काळे यांनी सांगितले. दरम्यान काळे यांचे अनोखी आंदोलन सुरु असताना पालीक प्रशासन शहरातील फ्लेक्स काढून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करीत होती.