कोपरगाव प्रतिनिधी, दि. 24 : कोपरगाव बसस्थानकात प्रवाशी आपल्या इच्छीत प्रवासाठी गेले तर सर्वांत अगोदर बस स्थानकात जावून बसावे लागते. बस स्थानकात गेल्यानंतर इच्छीत ठिकाणी जाण्यासाठी बहुदा बस वेळेवर लागत नसल्यामुळे ताटकळत एसटीची वाट बघत उकाड्याने बेजार व्हावे लागते. बसस्थानकात लावलेले पंखे फक्त दिखाव्यासाठी लावलेले आहे. अनेकदा पंखे चालुच नसतात.

वयोवृद्ध नागरीकांची बसची वाट बघता बघता जीवाची घालमेल होवू लागते गरमीने हैरान होतात, पण येथील डोक्यावरचे पंखे मात्र बंदच असतात. केवळ पंखेच नाही तर येथील शौचालयात जायचं म्हणजे थेट नरक यातना भोगाव्या लागता अशी स्थीती आहे. शौचालयाची दारे निम्मे तुटलेले, आत शौचालयाच्या भांड्याकडे बघताच शौचास येण्याएवजी उलटी यावे इतकी घाण अवस्था झाली आहे.

शौचालयातील नळांच्या तोट्या व्यवस्थित नाहीत काही नळांना तोट्याच नाहीत चोवितास पाणी वाहत असते. काहीं नळांना कपडे बांधून ठेवलेले आहेत. स्वच्छतेच्या नावाची तर ऐशी की तैशीच असल्याने सर्वसामान्य नागरीकांना कोपरगाव बसस्थानकात जाणे म्हणजे थेट सजा दिल्यासारखे आहे. कोपरगाव बसस्थानकातील हि अवस्था पाहुन प्रवास करणाऱ्यांची किती कुचंबणा होत असेल याची कल्पना करा. शौचालयतात गेल्यानवर शौचालय खराब आणि कोपरगाव आगाराच्या बस मध्ये बसल्यावर बस कुठे कधी बंद पडेल याचा नेम नाही.

बसचे अनेक ठिकाणी पञे उखडलेले, काही बाकडे वाकडे तिकडे, खालुन गाडीचे काळे ऑईल टपकत असते , अशा स्थितीत गाडी चालु झाली की, आगोदर गाडीतून मुबलक धूर बाहेर येतो मग पुढे खिळडिळ्या अवस्थेत बस निघते तेव्हा सोडवायला आलेले नातेवाईक एक हात वर करून टाटा करतात तर दुसऱ्या हाताने नाकतोंड झाकून घेतात. इतकी दनिय अवस्था कोपरगाव आगाराची असुनही आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांचे कसलेही नियोजन नाही.

खराब व खकाणा झालेल्या गाड्या लांब पल्ल्याला पाठवून प्रवासांचा व वाहक चालकांचा जीव धोक्यात घालवतायत अशी चर्चा नागरीकांमध्ये जोर धरू लागली आहे. बसायला बस व्यवस्थित नाही, ना तिथे शौचाला जायला शौचालय व्यवस्थित नाही. बसस्थानकातील पंखे तांञिक आडचणी मुळे बंद पडल्याचे सांगण्यात आले माञ कंट्रोल कॅबिनमधील दोन पंखे चोवस तास सुरु आहेत.

ज्या प्रवाशांच्या जोरावर व सर्व सामान्य नागरीकांच्या करामधून एसटी चालते त्या नागरीकांसाठी पंखे बंद, शौचालयांची योग्य स्वच्छता नही हि भयावह अवस्था झाली आहे. तरीही आगार प्रमुख व संबधीत कर्मचारी बघ्याची भूमिका का घेतायत. प्रवाशांची केवळ हालबेहाल करण्याची व्यवस्था करण्यासाठी आगार प्रमुख शासकीय पगार घेताय का? असा संतप्त सवाल अनेकांच्या मनान निर्माण होत आहे. कोपरगाव आगार सध्या अनेक समस्यांच्या विळख्यात असुन कर्मचारी व प्रवाशांची हाल बेहाल नित्याची झाली आहे.


