कोपरगाव आगार प्रमुखांचा प्रवाशी व कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. 30 : कोपरगाव आगाराचे प्रमुख अमोल बनकर हे केवळ कामात कुचराई करीत नसुन प्रवाशांच्या व चालक वाहकांच्या जीवाशी खेळत आहेत. नादुरुस्त गाड्या आहे हे माहीत असताना चालकांना लांब पल्ल्याच्या प्रवासाला पाठवायचे गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली असताना मध्येच बंद पडते. त्यानंतर आगार प्रमुख पुढचे आदेश देवुन उलट चालकावर आपला नको तो अधिकार गाजवतात हे आता चालक, वाहक उघडपणे पुराव्यासह बोलू लागले. 

 गेल्या वर्षभरापासून बसस्थानकातील पंखे कधी चालुच झाले नाहीत अनेक प्रसार माध्यमांनी त्यावर लक्ष वेधले. नागरीकांनी तक्रारी केल्या पण प्रत्येकांना तांञिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. लोकसंवादने याकडे लक्ष वेधून अधिक चौकशी केली असता समजले की, बसस्थानकातील पंखे तांञिक अडचणीमुळे बंद पडले नसुन ते जाणुनबुजून बंद ठेवले असल्याचे उघड झाले. मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता लोकसंवादच्या प्रतिनिधीने पंख्याच्या बटणाकडे पाहीले असता बटन बंद दिले. कंट्रोल कॅबिनमधील पंख्यांचे बटन संबधीत कर्मचाऱ्यांना  चालु करण्याची विनंती केली असता कर्मचारी अबोल झाले. अखेर त्यांना विनंती करुन बटन चालु करण्यास भाग पाडल्यानंतर पंखे विनाअडथळा दिवसभर सुरु झाले. सध्या प्रचंड गरमी वाढल्याने स्थानकात उपस्थित प्रवाशांना दिलासा मिळाला. 

 अजब  या गोष्टीचे वाटते की, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या सर्व गैरकारभाराला मुकसहमती देत आहेत का? एसटी महामंडळाच्या  जिल्हा नियंत्रण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बसस्थानकातील पंखे बंद करण्याच्या सुचना आगार प्रमुखांना दिल्या होत्या का? बनकर नेहमी एकच वाक्य बोलतात की, मी वरिष्ठांच्या सहमतीने व सुचनेनुसार काम करतोय. जिल्हा नियंत्रण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रवाशांचे हालबेहाल  झालाचा आनंद वाटतोय का? तब्बल एक वर्षापासुन जर पंखे बंद आहेत, दररोज गाड्या वारंवार बंद पडून प्रवाशांची हाल होत आहे. एसी बंद गाड्यांमध्ये प्रवाशी कोंबून  प्रवाशांचा श्वास गुदमरुन  मृत्यू होण्याची वाट पहात आहेत का?

गेल्या वर्षभरापासून कोपरगाव आगाराच्या गाड्या ह्या पुणे व नाशिक जाणाऱ्या वारंवार बंद पडत असल्याच्या अनेकवेळा तक्रारी असुन सुस्थितीत असलेल्या गाड्या न देण्यामागे  काय गुपित आहे? एसटी महामंडळाचे वरिष्ठ  अधिकारी हे मोठी  दुर्घटना घडण्याची वाट पहात आहेत का? प्रवाशांना पिण्यासाठी पाणी द्यायचे नाही. चालु असलेले पंखे बंद ठेवून नागरीकांच्या जीवाची घालमेल बघत बसायचे. नादुरुस्त  गाड्या मुळे काहीही होवू शकते हे सर्वश्रुत असुनही बेजबाबदार करण्यामागे कोणाचे हित दडले आहे  का  असे एक ना अनेक प्रश्न कोपरगाव बसस्थानकात येणाऱ्यांना पडला आहे. 

ज्या नागरीकांच्या करामधून तसेच  प्रवाशांच्या  पैशातुन एसटी महामंडळ वर्षाला कोट्यावधीचा फायदा घेतो. सरकारी तिजोरीत येणाऱ्या करातून अधिकाऱ्यांचा पगार  होतो,  तेच अधिकारी त्या नागरीकांच्या  जीवार उठले की काय असा संतप्त सवाल आज उपस्थित होत आहे.  एखाद्या अधिकाऱ्याची कती मुजोरी असावी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव आगाराचे बनकर असावेत. 

 दरम्यान बसस्थानकात सुरक्षेसाठी  पोलीसांकडून कायम दोन  कर्मचारी  तैनात आहेत. माञ त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बसस्थानकात बसण्यासाठी बनकर यांनी कसलीच व्यवस्था केली नाही. दोन बाकडे ठेवले होते तेही त्यांनी काढून घेतले. त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पिण्यासाठी पाणी सुध्दा दिले जात नाही. नागरीकांच्या  सुरक्षेसाठी असलेले  कर्मचारी बसस्थानकात आश्रय नसल्याने ते चक्क समता चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या माणुसकीच्या मंदीराच्या आश्रयाला बसतात.

आगार प्रमुख बनकर यांच्या मनमानी कारभाराचे अनेक कारनामे आता पुढे येत आहेत. आगार प्रमुख बनकर हे कोपरगाव आगातील अधिकारी आहेत ते तिथील समस्या सोडवण्यासाठी पण हल्ली बनकर हे येथील समस्या सोडवतात कमी आणि समस्या वाढवतात ज्यास्त अशी भयानक स्थिती   दिसत आहे. वरिष्ठ प्रशासनाने कोपरगाव आगारातील समस्याकडे गांभीर्याने लक्ष देणं काळाची गरज आहे.

 कोपरगाव आगाराची बस पुन्हा  भर रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांचे हाल बेहाल झाले. मंगळवारी दुपारी कोपरगाव वरून नाशिकला जाताना सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे बस बंद पडली. बस चालु होते पण  अचानक गती कमी झाल्याने गाडी चालताना धरसोड करीत होती. प्रवाशांच्या जीवाची धाकधूक चालु होती. 

Leave a Reply