कोपरगाव वकील संघाने दिवाळी फराळाचा खर्च टाळून केले चारा दान 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ :  यावर्षीच्या दुष्काळात माणसं कसेही जगतील पण जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जनावरांना चाऱ्या अभावी बाजारामध्ये कोणीही खरेदी घेत नसल्याने चाऱ्यामुळे जनावरांची हाल होवू नये म्हणून कोपरगाव वकील संघाच्या वतीने चारा वाटप करून दिवाळी साजरी केली.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यासह राज्यामध्ये दुष्काळाचे वातावरण तयार झालेले आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये देखील दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने दुष्काळ परिस्थिती तयार झालेली आहे. 

 दरवर्षी कोपरगाव वकील संघामध्ये दिवाळी सणानिमित्त दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. परंतु दुष्काळी परिस्थिती पाहता वकील संघाने यावर्षी दिवाळी फराळ करण्याऐवजी सदर खर्चाला फाटा देत दिवळी फराळाची होणारी रक्कम जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप  लासुरे यांनी दिली.

लासुरे पुढे म्हणाले की, आम्ही जरी वकीली व्यवसाय करत असलो तरी अगोदर शेतकरी आहोत म्हणून आम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा माहिती आहेत. या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी आणि चाऱ्याची कमतरता भासत असल्याने जनावरे जगवणे कठीण झाले आहे. शेतकऱ्याकडे जनावरांना जगवण्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही आणि दुसरीकडे बाजारात जनावरांना भाव नाही या दोन्ही परिस्थितीमध्ये मुक्या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी वकील संघाने माणुसकीच्या भावनेतून कोकमठाण येथील गोकुळधाम गोशाळेला ३ हजार २०० किलो वाढे चारा दान करण्यात आला . 

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष  ॲड. दिलीप  लासुरे,  ॲड. सुरेश मोकळ,  ॲड. दीपक पवार, ॲड. सी.एम. वाबळे,  ॲड. संजय मंडलिक, सचिव ॲड. दिपक जाधव, शिपाई दत्तात्रय देवकर आदी उपस्थित होते. दरम्यान गो शाळेतील जनावरांना चारा खाऊ घालून सदर चारा गोशाळेच्या व्यवस्थापकाकडे सोपवण्यात आला.

 वकिलांनी आजपर्यंत माणसांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण यावर्षी दुष्काळाची तिव्रता लक्षात घेवून  जनावरांनाच्या आत्म्याची जान राखत  मोफत चारा वाटप करून वकिल संघाने नवा आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply