जायकवाडीधरणाचे  २० टक्के पाण्याचे झाले बाष्पीभवन, जलसंपदा विभागाची माहिती !

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळण्यासाठी त्या भागातील अनेक जलतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते जनरेट्याच्या आधारावर  नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणातुन मराठवाड्याला पाणी देण्याचा जोर लावतात. गरजेनुसार सर्वांना पाणी मिळाले पाहीजे तो सर्वांचा हक्क आहे. परंतू  जिथे जायकवाडी सारखे सर्वात मोठे १०२ टीएमसीचे धरण या चालु पावसाळ्यात काठोकाठ शंभर टक्के भरले. राज्यात पाऊस अतिशय कमी पडल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे पिकं पावसामुळे गेल्याने पाण्याची गरज सर्वांना आहे. माञ शंभर टक्के जायकवाडी धरणात पाणी असताना चक्क पावसाळा व हिवाळ्याच्या मोसमात धरणातले पाणी २० टक्के  घटले.

जलसंपदा विभागाने सांगितले की, मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने पाण्याची पातळी २० टक्क्याने  कमी झाली. २ नोव्हेंबर रोजी छञपती संभाजी नगर येथील जलसंपदा विभागाच्या आयुक्त कार्यालयात नुकत्यात झालेलेल्या सिंचन आढावा बैठकीत खुद जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी धरणातील पाणी साठ्याची आकडेवारी सांगताना म्हणाले सध्या जायकवाडी धरणात ८० टक्के पाणी साठा असुन, उपयुक्त साठा ५८ टक्के आहे. यावरून सिध्द होते गरजवंत शेतकऱ्यांना व पाणी वापर संस्थांना पाणी मिळण्या ऐवजी कडक उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच २०टक्क्या पेक्षा अधिक  पाणी  गायब झाले. 

जायकवाडी  धरणावर जितका प्रखर सुर्य  आग ओकत होता, तितकाच नाशिक जिल्ह्यातील धरणावरही प्रखर सुर्य आग ओकत होता. माञ  नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा उपलब्ध आहे. काही धरणामध्ये तर चक्क ९८ ते ९९ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांचा मिळून सध्याचा उपलब्ध पाणी साठा  तब्बल ९१. ६० टक्के इतका आहे. गतवर्षी याच दिवशी मुबलक पाऊस पडूनही ९९. ०६ टक्के पाणी साठा होता. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणी जपून वापरण्याचे नियोज जलसंपदा विभागासह या धरणावरील लाभधारक शेतकऱ्यांनी व‌नागरीकांनी  ठरवले त्यामुळे धरणातील पाणी जपुन वापरत आहेत.

या उलट जायकवाडी धरणातील  पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात खरच बाष्पीभवन होते की अन्य कारखानदार व पाणी वापर संस्था वेगळ्या मार्गाने पाण्याचा बेसुमार वापर करीत आहेत असा प्रश्न नगर नाशिक जिल्ह्यातील तहानलेल्या नागरीकांना व शेतकऱ्यांना पडला आहे. एका बाजुला जलसंपदा विभागाच्या वतीने संपूर्ण राज्याला सांगितले जाते की, कमी पाण्याचे पिकं घ्या जनावरांच्या चारापाण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करा. पिण्याणे पाणी  जपुन  वापरा. जलसंपदा विभागाच्या प्रत्येक सुचनेचे पालन फक्त गोदावरी खोऱ्यातील  नगर नाशिक जिल्ह्यातील नागरीकांनीच करायचे का?

तहानेने कायम व्याकुळ असणाऱ्या  कोपरगावकरांनाच कायम बंधने व पाणी कपात का?  मराठवाड्यातील  काही तथाकथित जलतज्ञ  कायम नगर नाशिक जिल्ह्यातील धरणावर डोळा ठेवून  येथील धरणातील पाण्याच्या थेंबा थेंबाचा हिशोब मागतात मग तुमच्या अखत्यारीत असलेल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा हिशोब कधी देणार . कधीतरी एकदा जायकवाडी  धरणाच्या पाण्याचा हिशोब नगर नाशिकच्या नेत्यांना व जनतेला दिला पाहीजे. जनरेट्याच्या आधारावर सरकारवर दबाव टाकुन दुसऱ्याच्या तोंडातले पाणी पळवणे आता तरी थांबवा. दुष्काळाचे संकट सर्वांवर ओढवले आहे. आतातरी पाण्यावरून राजकारण करु नये. 

 नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या टक्केवारी नुसार पाणी साठा पुढील प्रमाणे  दारणा – ९५.०३, वाकी- ९२.९४, भावली- ९८.८८, भाम- ९९.३९, वालदेवी – ९५.५९, गंगापूर – ८९.११, कश्यपी ९८.२७, मुकणे- ७८.७७  टक्के पाणी साठा आहे तर इतर छोटी मोठी धरणे सरासरी ९५ टक्के भरलेले असुन नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये सध्या उपलब्ध पाणीसाठा ९१.६० टक्के इतका उपलब्ध आहे.

Leave a Reply