पाच हजार बोगस खरेदी विक्रीचे व्यवहार- अरुण मुंढे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०८ : शहरातील बोगस बिनशेती जागेच्या नोंदीबाबत कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी दिला आहे. यावेळी मुंढे यांनी, आपण या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करून वर्ष झाले तरी ही गुन्हे दाखल होण्यास विलंब होत आहे.

यात अधिकारी बचावात्मक भुमिका घेत असल्याचा आरोप करून, शेवगाव शहरात ४२ ब अंतर्गत बेकायदेशीर बिनशेती आदेश प्रकरणी तात्कालीन अपर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने चौकशीअंती यामध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमीतता आढळून आली.

सांक्षाकित दप्तर गहाळ होऊन, बनावट दप्तर निदर्शनास आले व इतरही त्रुटी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केलेला आहे. तर याबाबत बोगस खरेदी विक्री व्यवहाराचे पुनरिक्षण झालेले आहे. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.

जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना चौकशी करुन संबंधीतावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, खोटे आदेश असे निदर्शनास आले असून देखील कारवाईस दिरंगाई होत आहे.

ही प्रकरणे बोगस असताना जनतेची लुट झाली तरी चालेल पंरतु अधिकाऱ्यांची बचावाची भुमिका वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. असे मुंढे म्हणाले. या सर्व प्रकरणात जवळपास पाच हजार बोगस खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असावेत, असा संशय ही मुढे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधीत आदेशाचे फेरफार तहसीलदार यांच्या थम्स शिवाय प्रमाणीत होत नाहीत. याचा अर्थ तलाठी, सर्कल, लिपीक, सबरजिस्टार व दलाल यांच्या साखळी संगनमताणे बोगस खरेदी विक्री नोंद घेऊन ले आऊटला मंजुरी देण्यात आल्या आहेत. या व्यतिरीक्त वर्ग २ च्या जमिनीत फॉरेस्ट विभागाच्या खोट्या नाहरकत देण्यात आल्या.

अदला बदली व्यवहारात ज्या वर्ग २ च्या जमिनी शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या कुठेही अस्तित्वात नाहीत. तरीही वरिष्ठ अधिकारी संबंधीत अधिकाऱ्यांना वाचवु इच्छित आहेत.

यावर तातडीने कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात याचीका दाखल करुन, जिल्हाधिकारी व महसुल उपविभागीय अधिकारी यांना न्यायालयात पार्टी करणार असल्याचे ही मुंढे यांनी शेवटी म्हटले आहे. 

ReplyReply allForward