कोपरगाव मार्केट कमेटी विस्तारीकरणाची मागणी- नितीन शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : कोपरगाव शहरात खंडोबा मंदिराजवळ महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली जागेत गट नं.१९३५ A या ५० एकर ३३ गुंठे प्रशस्त जागेत शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांना मध्यवर्ती असलेल्या मार्केट कमेटीचा नव्याने विस्तार करणेबाबत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस, नितीन मनोहर शिंदे यांची पत्राद्वारे मागणी केली आहे. 

वरील नमुद केलेली जागा ही राष्ट्रीय महामार्ग ७५२-जी लगत आहे. सदर जागा मार्केट कमेटीचा विस्तारीकरण करण्यास योग्य आहे, शेतकरी आणि आम्हा सर्वांना मान्य आहे. तेथे मार्केट कमेटी स्थलांतरित आणि विस्तारित केल्यास, सर्वांनाच सोईस्कर होवू शकते.

सदर जागा महाराष्ट्र शासनाचे मालकीची आहे. मात्र सदर जागेत महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्टने शेतकी प्रदर्शनाच्या नावाखाली बांधकाम केलेले आहे. तेथे गाळे उभारणी करुन, भव्य मंगल कार्यालय भव्य वाहनतळासह उभारणी केलेली आहे. नुकत्याच मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ही जागा ईतर कोणाचीही नसून ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे. मात्र त्याचे उत्पन्न आजही बेकायदेशीर पणे ठराविक लाभार्थी बेकायदेशीर पणे घेत आहे.

 ही बाब उच्च न्यायालयाचे निदर्शनास आले, नंतर सदर ठिकाणी महाराष्ट्र शासन मालकी हक्काचा ७/१२ उतारा आहे. येथील मंगल कार्यालयाचे दोन्ही मोठे हाॅल मध्ये शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी वेअर हाऊस म्हणून उपयोग होवू शकतो. सदर ठिकाणी व्यापारी यांचेसाठी अधिक गाळे उपलब्ध होवून शकतात. सध्या या शासकीय जमीनीवर उपलब्ध असलेल्या ईमारतीत शासकीय कार्यालय अथवा मार्केट कमेटीचे सुसज्ज कार्यालय ताबडतोब उपलब्ध होवू शकते. 

तसेच सदर जागा ही राष्ट्रीय महामार्ग लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळण आणि शहराच्या बाजारपेठेच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीस व येण्या-जाण्यासाठी सोईचे होईल. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून सरकारला धन्यवाद देतील. कोपरगाव शहरात ग्रामीण जनतेचे दळणवळण वाढून बाजारपेठ वाढीस मोठी मदत होईल. असे सांगत वरील निवेदनाचा काटेकोरपणे शासन हितकारक निर्णय घ्यावा. अशी विनंती शेवटी केली आहे. 

सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी व आवश्यक त्या सर्व कारवाईसाठी विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना (श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांचे सह अनेकांना सदर निवेदन पाठविले आहे.