स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१३ : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे बाबा ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि.१२)रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात १८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सकाळी ठीक ९ वाजता वडुले खुर्द मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर स्व. मुंडे  यांच्या प्रतिमेला सरपंच भाऊसाहेब आव्हाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Mypage

यावेळी बाबा ग्रुपचे अध्यक्ष विष्णुदास आव्हाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच युवक मित्र व ग्रामस्थ उपस्थित होते. वडुले खुर्द मध्ये स्व. मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यावेळी ज्येष्ठ नेते  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही निरोगी भरभराटीचे आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

tml> Mypage

यावेळी रक्तदाते संदिप आव्हाड, विष्णू आव्हाड, किशोर सोनवणे, मारुती आव्हाड, रामनाथ खेडकर, विशाल कलपूड, शुभम आव्हाड, शरद आंधळे, देविदास गीते, प्रसद शिरसाट, संकेत आव्हाड, प्रमोद पठाडे, संतोष मिसाळ, ऋषिकेश आंधळे, रोहित गीते, महेश पालवे, रोहिदास गीते, सुनिल रणमले, यांनी रक्तदान केले.

Mypage