सर्व कुणबी व मराठा विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशीप मिळावी

Mypage

पीएचडी धारक विद्यार्थ्यांची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ९ : सारथी संशोधन अधिछात्रवृत्ती २०२३ पात्र सर्व मराठा आणि कुणबी मराठा विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशीप मिळावी. अशा मागणीचे निवेदन आज शनिवारी (दि ९ )  खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार मोनिकाताई राजळे यांना देण्यात आले. 

tml> Mypage

खा . विखे यांचे हस्ते शेवगाव तालुक्यातील घोटण येथे रस्त्याचे भुमी पुजन करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पीएच.डी. संशोधक विद्यार्थी चंद्रशेखर मुरदारे, गोविंद निकम, सचिन पवार आदि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने आमदार राजळे यांना हा मुद्दा नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंती करण्यात आली. 

Mypage