अक्षय रत्नपारखी याची दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी-२० भारतीय संघात निवड

मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा – बिपीन कोल्हे 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ९ :  हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनांत मैदानी खेळ चांगले असुन मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग देवुन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.             

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनी युवा प्रतिष्ठान व उद्योग समुहाच्यावतीने तालुक्यातील संवत्सर येथील अक्षय सुनिल रत्नपारखी याची २५ ते २७ डिसेंबर दरम्यान आग्रा येथे भारत विरूध्द नेपाळ दरम्यान होणा-या सामन्यासाठी दिव्यांग आंतरराष्ट्रीय क्रिकेट टी-२० संघात भारताकडुन निवड झाल्याबददल त्याचा शनिवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

            प्रारंभी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अक्षय रत्नपारखीच्या क्रिकेट खेळाचे कौतुक करत उज्वल भवितव्यास सदिच्छा दिल्या. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी स्वागत केले. संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी प्रास्तविकांत अक्षय रत्नपारखी याने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत दिव्यांग क्रिकेट खेळात जे नैपुण्य दाखविले त्यामुळे त्याची ही निवड झाल्याचे सांगितले.

    कोल्हे पुढे म्हणाले की, अभासी दुनियेचा विळखा प्रत्येकाला मोठ्या प्रमाणांत बसत आहे. आई वडील, काका काकु, आजी आजोबा यांच्या ऐवजी लहान मुलांमध्ये भ्रमणध्वनीचे आकर्षण वाढले आहे, वयोवृध्दही त्याला अपवाद आहेत. त्याच्या अतिवापरामुळे मैदानी खेळाकडे युवापिढीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अक्षय रत्नपारखी दिव्यांग जरी असले तरी त्यांनी क्रिकेटमधील आवड जपली आहे त्याची निवड हा राज्यासाठी अभिमान आहे.

           सत्कारास उत्तर देतांना अक्षय रत्नपारखी म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि संजीवनी हे एक अतुट नाते आहे. त्याठिकाणी झालेला सत्कार आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. जनता इंग्लिश स्कुल संवत्सर व आत्मा मालिकच्या मैदानावर नागपुरचे प्रशिक्षक उत्तम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळात सातत्य ठेवले.

पंजाब, मोहाली, राजस्थान, छत्तीसगढ़ आदि ठिकाणी विविध स्पर्धेत संवत्सर गांवचे नांव उज्वल करता आले. युवकांना ज्या खेळाची आवड आहे त्यात जीदद ठेवुन मार्गाक्रमण केल्यास यशाचे शिखर निश्चित गाठता येते असे सांगुन लवकरच दुबई येथील स्पर्धेतही भारत देशाचे नांव दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत उज्वल करू असे ते म्हणाले.

  शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, विलासराव वाबळे, त्रंबकराव सरोदे, बापूसाहेब बारहाते, निवृत्ती बनकर, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, ज्ञानेश्वर होन,विलास माळी, आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे, भाजपा दिव्यांग तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, संजय भाकरे, राजेंद्र भाकरे, विजय काळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख उपस्थित होते.