कोपरगाव प्रतिनिधी दि. ९ : कोपरगाव येथील प्रसिद्ध स्ञीरोग तज्ञ डॉ. कुलदीप वाघ यांचे पुणे येथे हृदय विकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झाले. कोपरगाव येथे दोन पिढ्यांपासून वैद्यकीय क्षेञात अविरत सेवा करणारे वाघ कुटुंबातील डॉ. कुलदीप वाघ हे प्रमुख होते.
डॉ. कुलदीप वाघ यांच्या पाश्चात्य आई डॉ. शांता वाघ, बंधु डॉ. इंद्रनील वाघ, पत्नी डॉ. राधिका वाघ एक मुलगा असा परिवार आहे. स्व. डॉ. वाघ यांच्यावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. कुलदीप वाघ यांच्या निधनाने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.