भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि २९ :  पोहेगाव येथील भी. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये रवी राजमाने (येळावी, सांगली), विठ्ठल खिलारी (शेनवडी, सातारा), महादेव माने (खंडोबाची वाडी, सांगली), ऐश्वर्य पाटेकर (नाशिक, तान्हाजी बोऱ्हाडे (कानसे, पुणे)  व डॉ. देविदास तारू (नांदेड) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली.   याप्रसंगी ट्रस्टी श्री. रमेशराव रोहमारे, श्री संदीप रोहमारे,  अॅड्. राहुल रोहमारे व प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते. भि. ग.  रोहमारे ट्स्ट तर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२३ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १. मव्हटी – रवी राजमाने (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून२. सवळा – विठ्ठल खिलारी (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे) विभागून३. वसप – महादेव माने (ग्रामीण कथासंग्रह,ग्रंथाली प्रकाशन, माहीम, मुंबई)४. कासरा – ऐश्वर्य पाटेकर (ग्रामीण कविता संग्रह, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई) विभागून५. जळताना भुई पायतळी – तानाजी बोऱ्हाडे (ग्रामीण कविता संग्रह, काव्यग्रह प्रकाशन, वाशिम) विभागून६. आता मव्हं काय – डॉ. देविदास तारू (ग्रामीण आत्मकथन, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे)      प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख रुपये १५०००/ स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कादंबरी या व कविता संग्रह या साहित्यप्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण ६० साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. शिरीष लांडगे,  लक्ष्मण बारहाते, डॉ. विजय ठाणगे, डॉ.  जिभाऊ मोरे व डॉ. गणेश देशमुख यांच्या संयुक्त  निवड समितीने केले.            वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने जखडण (भीमराव वाघचौरे), ओवाळणी (हरिश्चंद्र पाटील), बयनामा (बा.बा. कोटंबे),  हंबरवाटा(संतोष आळंजकर),  काळजाचा नितळ तळ(भीमराव धुळुबुळू), पांडुरंगाच्या देशा(डॉ. सदानंद भोसले), ग्रामीण साहित्य चळवळ (डॉ. वासुदेव मुलाटे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे. पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की “वहिवाटीची वाट कधी कधी शेतकऱ्यांच्या जगण्यावरच उठत असते. याच शेतातल्या  वाटेसाठी अनेक पिढ्या कोर्ट कचेऱ्या करतात. खून, मारामाऱ्या करतात. प्रशासनही या प्रकारात सामील असते. हा सारा गुंता रवी राजमाने यांच्या ‘मव्हटी’ या कादंबरीत  चित्रित झाला आहे.  तर विठ्ठल खिलारी यांच्या ‘सवळा’ या पहिल्याच कादंबरीत ऊन, पाऊस सहन करत कोयत्याच्या आधारावर भाकरीचा तुकडा शोधणाऱ्या  ऊसतोड कामगाराच्या मुलाची करुण कथा अत्यंत जिवंत पद्धतीने चित्रीत केलेली आहे.  एकीकडे जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष आणि दुसरीकडे घेतलेले शिक्षण कुचकामी ठरवणारी भ्रष्ट व्यवस्था याचे प्रत्ययकारी चित्रण वाचकांना खिळवून ठेवते. ‘वसप’ या कथासंग्रहातील महादेव माने यांच्या कथांमध्ये रानशिवारातील शेतकरी शेतमजुरांचे जीवघेणे कष्ट, विवंचना आणि समस्या त्याचबरोबर शेतमजूर आणि पशुपालन जगाच्या सहजीवनाचा तसेच अडचणींचा परिसर 

Read more

सोमैया महाविद्यालय संविधान दिन साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा

Read more

सोमैया महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी चर्चासत्राचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात हिंदी विभाग व

Read more

सोमैयाची विद्यार्थीनी अनिता कुंभार्डे यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी.

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राच्या विद्यार्थीनी श्रीमती अनिता सूर्यभान

Read more

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविदयालयात मतदार जनजागृती अभियान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविदयालयाच्या वतीने सोमवार दि. २९ रोजी मतदार

Read more

प्रा.रवींद्र ठाकरे यांना पी.एच.डी. पदवी प्राप्त

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ :  स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी संशोधन केंद्राचे संशोधक विदयार्थी रवींद्र पुंजाराम ठाकरे यांना सावित्रीबाई

Read more

गरिबी हा श्रीमंत होण्यासाठीचा सर्वात मोठा मार्ग – सुदाम शेळके

सोमैया महाविद्यालयात पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ :  “ज्याला आयुष्याच्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचा आहे, त्यानेच स्पर्धा-परीक्षेच्या वाट्याला जावं.

Read more

के. जे. सोमैया महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ :– स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये महाविद्यालयातील 64 विद्यार्थ्यांची

Read more

के.जे.सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

हिंदी काव्यवाचन स्पर्धेत समाधान वाव्हळ प्रथम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समाधान वाव्हळ याने सावित्रीबाई

Read more